×

Shocking | मुमताज यांचं होतं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज (Mumtaz) या काही दिवसांपूर्वी त्यांच्या तब्येतीमुळे चर्चेत होत्या. नुकतेच, हॉस्पिटलमधून घरी परतलेल्या अभिनेत्रीने त्यांच्या चाहत्यांना सांगितले की, त्या एका विशेष प्रकारच्या आजाराशी झुंज देत आहे. त्याचवेळी आता मुमताज यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने नुकतेच त्यांच्या आयुष्याशी निगडित एक रहस्य उघड केले आहे, जे ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. मुमताजने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या अफेअरबद्दल खुलासा केला आहे.

अलीकडेच एका वेबसाइटशी झालेल्या संभाषणात अभिनेत्रीने तिच्या पती मयूर माधवानीच्या अफेअरनंतर झालेल्या तिच्या अफेअरबद्दल सांगितले. अभिनेत्रीने सांगितले की, “पुरुषांसाठी अफेअर करणे सोपे असते. माझ्या पतीचेही एक होते. मी त्यांचा आदर करते, कारण त्यांनीच मला याबद्दल सांगितले होते.” मुमताज यांनी सांगितले की, “माझ्या पतीला अमेरिकेतील एक मुलगी पसंत होती. त्यांनी मला सांगितले की, तू माझी पत्नी आहेस. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि करत राहीन. मी तुला कधीही सोडणार नाही.” (after marriage mumtaz had an extra marital affair actress revealed a shocking truth)

अभिनेत्री पुढे म्हणाली, “आज आमच्यासाठी ही एक विसरलेली गोष्ट आहे. देवही आयुष्यात एकदा तरी हे करतो. मी एका राणीसारखी आहे. माझ्या पतीने मला कधीही कोणत्याही गोष्टीची अडचण येऊ दिली नाही.” आपल्या अफेअरबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “पतीच्या अफेअरनंतर मला एकटेपणा जाणवू लागला होता. मला खूप वाईट वाटलं, म्हणून मी भारतात आले. इथे माझे अफेअर सुरू झाले होते, परंतु ते गंभीर नव्हते. तो क्षणिक टप्पा होता, जो लवकरच संपला.”

अभिनेत्रीने त्यांच्या अफेअरबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी एका मुलाखतीतही कबूल केले होते की, लग्नानंतर त्यांच्या पतीचे दुसऱ्या कोणाशी तरी अफेअर होते. पतीच्या अफेअरनंतर त्यांचेही कोणाशी तरी अफेअर होते, असेही त्यांनी सांगितले होते. अभिनेत्री मुमताजची प्रकृती खालावल्याने त्यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्या आठवडाभर रुग्णालयात होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post