×

हवाईसुंदरीलाही आवरला नाही ‘सामी सामी’वर थिरकायचा मोह, दाक्षिणात्य लूकमध्ये धरला ठेका

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील गाणी आणि डायलॉग प्रेक्षकांच्या जिभेवर आहेत. यावर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ बनवले जात आहेत. ‘पुष्पा’च्या ‘सामी सामी’ या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे आणि यावर स्टार्सपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेकजण सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो खूप लोकप्रिय होत आहे.

कंटेंट क्रिएटर आणि एअर होस्टेस आयतनेही एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती सामी सामी गाण्यावर डान्स करत असून चाहत्यांना तिची स्टाइल आणि डान्स नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. (air hostess aayat dancing in the plane to the rashmika mandanna song saami saami)

View this post on Instagram

A post shared by Aᴀʏᴀᴛ urf Afreen (@_aayat_official)

‘सामी सामी’ या गाण्यावर बनवण्यात आलेला हा व्हिडिओ पोस्ट करत तिने लिहिलंय की, “या गाण्यासाठी अनेक रिक्वेस्ट आल्या होत्या.” तसेच तिच्या या व्हिडिओला २० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. याआधीही आयतने ‘पुष्पा’च्या ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स केला होता आणि या व्हिडिओलाही चाहत्यांची पसंती मिळाली होती.

View this post on Instagram

A post shared by Aᴀʏᴀᴛ urf Afreen (@_aayat_official)

आयतने विमानात ‘माणिके मागे हिते’ गाण्यावर डान्स केल्यानंतर तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या गाण्यात ती एअर होस्टेसच्या गणवेशात होती. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव केला होता. या व्हिडिओला जवळपास ५९ लाख लाईक्स मिळाले आहेत.

हेही वाचा-

Latest Post