Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड मोठी बातमी! बच्चन कुटुंबीयांची चिंता वाढली, ऐश्वर्या रायला ईडीचे समन्स; ‘या’ गंभीर प्रकरणात होणार चौकशी

मोठी बातमी! बच्चन कुटुंबीयांची चिंता वाढली, ऐश्वर्या रायला ईडीचे समन्स; ‘या’ गंभीर प्रकरणात होणार चौकशी

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai)आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. अभिनेत्री अनेकदा तिचे चित्रपट किंवा मनमोहक फोटोंमुळे चर्चेत येत असते. मात्र आता ती चर्चेत येण्याचे कारण वेगळेच आहे. बहुचर्चित पनामा पेपर्स लीक प्रकरणात (Panama Papers Leak Case) बच्चन कुटुंबाची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय आज दिल्लीच्या लोकनायक भवनात ईडीसमोर हजर होणार आहे. ईडीने तिला समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले होते.

पनामा पेपर्स प्रकरणाचा तपास बऱ्याच काळापासून सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे, या प्रकरणात अभिषेक बच्चनचीही (Abhishek Bachchan) चौकशी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी ऐश्वर्याला विचारण्यासाठी प्रश्नांची यादी तयार केली आहे. ऐश्वर्याने याआधीही या कागदपत्रांना खोटे असल्याचे म्हटले आहे. या कागदपत्रांमध्ये सिनेकलाकार आणि उद्योगपतींसह ५०० भारतीयांची नावे आहेत. (aishwarya rai bachchan to appear before ed in panama papers leak case)

या पेपर लीकमध्ये अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यासह अनेक भारतीय सेलिब्रिटींची नावे होती. सर्व लोकांवर कर फसवणुकीचे आरोप होते. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर, अमिताभ यांनी भारतीय नियमांनुसारच परदेशात पैसे पाठवले असल्याचे सांगितले होते. पनामा पेपर्समध्ये समोर आलेल्या कंपन्यांशी संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.

काय होते प्रकरण
दिनांक ३ एप्रिल २०१६ रोजी, पनामा या देशाला टॅक्स हेवन म्हटल्या जाणाऱ्या मोसॅक फोन्सेका या लॉ फर्मचा ४० वर्षांचा डेटा लीक झाला होता. जगभरातील श्रीमंत आणि प्रभावशाली लोक कर वाचवण्यासाठी ऑफ-शोअर कंपन्यांमध्ये पैसे कसे गुंतवत आहेत, हे यामध्ये उघड झाले. अशा प्रकारे करचोरी आणि मनी लाँड्रिंग मोठ्या प्रमाणावर होत होते. या कागदपत्रांमध्ये सेलिब्रिटी आणि उद्योगपतींसह ५०० भारतीयांची नावे आहेत. यामध्ये बच्चन कुटुंबाचेही नाव दिसले. ऐश्वर्या राय ही देशाबाहेरील कंपनीची संचालक आणि भागधारक असल्याचा दावा करण्यात आला होता. ऐश्वर्याशिवाय तिचे वडील के. राय, आई वृंदा राय आणि भाऊ आदित्य राय हे देखील कंपनीत तिचे भागीदार होते.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत सांगितले होते की, पनामा पेपर्स लीक प्रकरणात भारतातील लोकांच्या संबंधात एकूण २०,०७८ कोटी रुपयांची अघोषित संपत्ती उघडकीस आली आहे.

आता या प्रकरणात आणखी काय खुलासे होतात आणि कोणाकोणाला ईडीच्या चौकशीचा सामना करावा लागेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा