Monday, July 1, 2024

अक्षय कुमारला ‘ओ घर आजा परदेसी’ गाण्याची भुरळ; ‘गदर 2’चे प्रमोशन करत अभिनेता म्हणाला…

गदर: एक प्रेम कथा’ हा चित्रपट 2001 साली आला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात स्वत:च एक विषेश स्थान निर्माण केले. हा चित्रपट तुफान गाजला. हा चित्रपट आजही लोक पाहतात. याच चित्रपटाचा सीक्वल ‘गदर 2’ तब्बल 22 वर्षानी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट शुक्रवारी (दि.11 ऑगस्ट) चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत 135 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड-2‘ या चित्रपटाशी टक्कर देत आहे.

दोन्ही चित्रपटांना चाहत्यांकडून खूप प्रतिसाद मिळत आहे. कमाईबद्दल बोलायचे झाले तर, ‘ओह माय गॉड- 2’ सध्या बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’च्या मागे आहे. सनी देओल (Sunny Deol) याच्या ‘गदर 2’ (Ghadar 2) चित्रपटाने पहिल्या दिवशी 40.10 कोटी, दुसऱ्या दिवशी 43.08 कोटी कमाई केली आहे. इतकेचं नाही तर तिसऱ्या दिवशी 49.50 ते 51.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

22 वर्षांनंतर सनी देओल पडद्यावर ‘तारा सिंग‘च्या रुपात पाकिस्तानात घुसून ‘हिंदुस्तान जिंदाबाद’चा नारा देताना दिसत आहे. त्याच्या चित्रपटाला फक्त चाहत्यांचाच नाही तर सलमान खानपासून रितेश देशमुख आणि कंगना राणौतसारख्या अनेक सेलिब्रेटींनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. या स्टार्स व्यतिरिक्त अक्षय कुमार (Akshay Kumar) देखील सनी देओलच्या ‘गदर 2’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला आहे.

‘ओह माय गॉड- 2’ या चित्रपटात एक दृश्य आहे, ज्यात आपला भक्त कांती शरण मुदगल याला शिवाचा दूत म्हणून मदत करायला आला आहे. त्यावेळी अक्षय कुमार त्याच्या घराखाली झाडाच्या सावलीत बसलेला आहे. सनी देओलच्या ‘गदर 2’ चित्रपटातील ‘ओ घर आजा परदेसी’ गाणं म्हणत आहे. अक्षय कुमारने सनी देओलच्या चित्रपटातील गाण्याच्या 1 किंवा 2 ओळीच नव्हे तर OMG 2 चित्रपटातील जवळपास संपूर्ण गाणं म्हटले आहे. हे पाहून रसिकांनाही आनंद झाला आणि थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. (Akshay Kumar loved the song ‘O Ghar Aaja Pardesi’ from Sunny Deol’s Gadar 2)

अधिक वाचा- 
सनीच्या Gadar 2चा विषयच खोल! ट्रॅक्टरमध्ये बसून चाहत्यांनी गाठलं थिएटर, आनंद महिंद्रांनीही शेअर केला व्हिडिओ
‘काही लोक रातोरात यशस्वी होतात, काहींना स्वत:ला सिद्ध…’, ‘OMG 2’च्या रिलीजनंतर यामीचे मोठे भाष्य

हे देखील वाचा