‘ओह माय गॉड २’ चित्रपटाची शूटिंग सुरू; पंकज त्रिपाठींसोबत दिसला अक्षय कुमार, व्हिडिओ जोरदार व्हायरल

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारने ‘ओह माय गॉड २’ चित्रपटाची शूटिंग सुरू केली आहे. या चित्रपटात अभिनेते पंकज त्रिपाठी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शनिवारी (२३ ऑक्टोबर) अक्षयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यासोबतच चित्रपटाचा पहिला पोस्टर देखील त्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

अक्षयने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जिथे जगाची सुरुवात आणि जगाचे प्रस्थान, आरंभ आणि अनंतकाळाचे स्वामी आणि शंकर देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी संन्यासी शहर उज्जैन येथे मी आणि माझे मित्र पंकज त्रिपाठी पोहोचलो.”

या व्हिडिओमध्ये ते दोघे चालत आहेत आणि चालता चालता खूप हसताना देखील दिसत आहेत. ‘ओह माय गॉड २’च्या चित्रपटात अक्षय शंकर देवाच्या भूमिकेत दिसणार आहे. (actor akshay kumar spotted on film omg 2 sets with pankaj tripathi video goes viral on social media)

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

सोशल मीडियावर ‘ओह माय गॉड २’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करत अक्षयने लिहिले की, “तुमच्या आशीर्वाद आणि प्रार्थनांची आवश्यकता आहे. ओएमजी २साठी आमचा खरा आणि प्रामाणिक प्रयत्न एक आवश्यक सामाजिक मुद्दा उचलणे आहे. आदियोगी या यात्रेसाठी आम्हाला आशीर्वाद द्या. हर हर महादेव.”

तसेच सन २०१२मध्ये ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट आला होता, तेव्हा त्यामध्ये परेश रावल आणि अक्षय कुमार हे दोघे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला होता आणि तशी त्यांनी चांगली कमाई देखील केली होती.

यासोबतच अक्षयने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्याचा ‘बेलबॉटम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून ‘अतरंगी रे’, ‘रक्षाबंधन’, ‘राम सेतू’, ‘मिशन सिंड्रेला’ आणि ‘सुर्यवंशी’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरे व्वा! ‘ओह माय गॉड २’ चित्रपटाचे पहिला पोस्टर रिलीझ, पाहायला मिळाले अक्षय कुमारचे ‘महादेव’ रूप

-गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे साराला पडले महागात, सोशल मीडियावर होतेय ट्रोल

-अनन्या पांडेच्या अडचणीत वाढ; जुने चॅट रिट्रिव्ह करण्यासाठी एनसीबीने जप्त केल्या ‘या’ गोष्टी

Latest Post