कपूर कुटुंब आणि भट्ट कुटुंबाच्या घरी आनंदाची बातमी दरवाज्यात ऊभी राहिली आहे. काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचे लग्न झाले. लग्नाला वर्ष देखिल पार पडले नाही आणि आभिनेत्रीने आनंदाची बातमी चाहत्यांना देऊन टाकली. त्यामुळे अभिनेत्रीच्या कुटुंबासोबतच चाहते देखिल खूपच खुश आहेत. नुकतंच माहिती समोर आली आहे की, आलिया डिलेव्हरीसाठी दवाखान्यामध्ये दाखल झाली आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिच्या डिलेव्हरीचेल दिवस पूर्ण झाले आहेत, त्यामुळे आलियाला गिरगावच्या सर एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यता आले आहे. रविवार (दि.6 नोव्हेंबर) दिवशी सकाळ 7:30 च्या सुमारास अभिनेत्रीला आपल्या कुटुंबाने दवाखान्यात भर्ती केले. त्यामुळे लवकरच लहान पाहुण्याचे आगमन होणार आहे.
ही बातमी समोर येताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कही चाहते असा अनुमान लावत आहे की, अभिनेत्री ट्वींस बाळांना जन्म देणार. कपूर आणि भट्ट कुटुंब बाळाच्या आगमनासाठी आतुरतेने वाट पाहात असून अनेक तयारी देखल करुन ठेवल्या आहेत. पण पूर्वी असे सांगितले होते की, आलिया नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये बाळाला जन्म देईल मात्र, आता आशा बातम्या येत आहेत की, अभिनेत्री नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच बाळा जन्म देण्याची शक्यता दिसून येत आहे.
अभिनेत्रीच्या प्रेंग्नेंसीच्या बातमीने जसा धक्का दिला होता, त्याप्रमानेच डिलेव्हरीच्या बातमीने देखिल चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अभिनेत्री बाळाला जन्म दिल्यानंतर एक वर्षासाठी बॉलिवीडमधून ब्रेक घेणार आहे. ती सर्वाधिक काळ आपल्या मुलासोबत घालवणार आहे. अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने बॉक्सऑफसवर चांगलीच धमाल केली होती. ब्रेकनंतर परतल्यावर आलिया रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याचा आगामी येणारा चित्रपट ‘रॉकी और राणी की प्रेम काहणी’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे.
आलयाने बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने खूप लोकप्रियता मिळवली त्यामुळे अभिनेत्री हॉलिवूडमध्ये जाण्यासाठी सज्ज झाली आहे. आलिया ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटाने हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! महाभारतातील दुर्योधन पात्रासाठी पाच हजार ऑडिशनमधून झाली होती ‘या’ अभिनेत्याची निवड
डबल एक्सेल गर्ल! सोनाक्षी सिन्हाचे काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फुलले सौंद्रर्य