Thursday, March 28, 2024

काय सांगता! महाभारतातील दुर्योधन पात्रासाठी पाच हजार ऑडिशनमधून झाली होती ‘या’ अभिनेत्याची निवड

भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात दूरदर्शन या चॅनलने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. या चॅनेलवर दाखवल्या जाणाऱ्या पौराणिक कथा देखील प्रेक्षकांना खूप पसंतीस पडल्या होत्या. आजही त्या मालिकांमधील एक जरी झलक प्रेक्षकांनी पाहिली तरी त्यांचा आनंद गगनात मावेनासा नाही. आनंद का होऊ नये? या मालिकेतील एक झलक देखील आपल्याला त्या काळातील चित्र डोळ्यासमोर आणून ठेवतात.

दूरदर्शनवरील मालिकांनी प्रेक्षकांचे एवढे मनोरंजन केले आहे की, आजही सगळ्यांच्या मनात त्या मालिकांची जागा कायम आहे. मग त्यामध्ये मोगली असो, विक्रम बेताल असो किंवा पौराणिक कथा रामायण किंवा महाभारत असो. या सगळ्या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. या मालिकांची खासियत ही होती की, कुटुंबातील सगळे सदस्य एकत्र बसून या मालिका बघत होते. काही मालिका केवळ कुटुंबातील व्यक्ती नाही, तर संपूर्ण कॉलनी एकत्र येऊन या मालिका बघत असे. यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीला पडत असे. महाभारतातील दुर्योधन या पात्राने देखील आपल एक अढळ स्थान निर्माण केले होते.

महाभारतातील पात्र निवडण्यासाठी जवळपास पाच हजार व्यक्तींचे ऑडिशन घेतले गेले होते. एवढे ऑडिशन घेणे सोपे नव्हते. त्याकाळी कलाकारांमध्ये जास्त रस नव्हता. तेव्हा पाच हजार व्यक्तींमधून जेव्हा पुनीत यांना दुर्योधन या पात्रासाठी निवडले, तेव्हा त्याला खूपच आनंद झाला होता. परंतु या पात्रासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली.

पुनीत इस्सर हे तेच अभिनेते आहेत, ज्यांनी कुली या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांना चुकून बुक्का मारला होता. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना हॉस्पिटलमध्ये जावे लागले होते. अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली होती. त्यांच्या या वागण्यामुळे महाभारतातील निर्माते त्याला मालिकेमध्ये काम देण्यास नकार देत होते.

पुनीत हे एक उंच बांध्याचे अभिनेते आहेत. त्यामुळे बीआर चोप्रा यांच्या महाभारतातील भीम या‌ पात्रासाठी त्यांना ग्राह्य धरले जात होते. पण एका मुलाखतीत पुनीत यांनी सांगितले होते की, त्यांनी चोप्रा साहेब, पंडित नरेंद्र आणि संवाद लेखक राही मासूम रजा यांच्यासमोर जयद्रथच्या वधाचा सीन केला होता. त्यांंचा अभिनय पाहून त्यांना दुर्योधनच्या पात्रासाठी कास्ट केले गेले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
डबल एक्सेल गर्ल! सोनाक्षी सिन्हाचे काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फुलले सौंद्रर्य

अय्याे! गाैतम असा काय वागला की, साैंदर्या शर्मा रडली ढसाढसा

हे देखील वाचा