Sunday, October 1, 2023

आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर ‘हा’ सिनेमा ठरला सर्वोत्तम हिंदी चित्रपट; वाचा विजेत्यांची यादी

सिनेसृष्टीतील कलाकारांनी वर्षभर जीव ओतून काम केलेल्या कामगिरीच फळ त्यांना एक ना एक दिवस मिळतच. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची (National Film Awards ) सुरूवात ही 1954 पासून करण्यात आली आहे. हा भारतातील चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. विशेष म्हणजे भारताचे राष्ट्रपती हा पुरस्कार विजेत्यांना प्रदान करतात. गुरुवारी (24 ऑगस्ट) दिल्लीत देशभरातील कलाकारांचा गौरव करत 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

विशेषतः भारतीय कलाकारांसाठी हे पुरस्कार दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर मधून जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट अभिनेत्यापासून ते गायकापर्यंतचा गौरव करण्यात आला. प्रत्येक वेळेप्रमाणे या वेळीही सर्वांच्या नजरा सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर खिळल्या होत्या. आलिया भट्ट आणि क्रिती सेनन यांना यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

गुरुवारी सकाळपासूनच सोशल मीडियावर चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्स आणि चित्रपटांच्या नावांची चर्चा करताना दिसत आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘पुष्पा: द राइज’साठी अल्लू अर्जुनला मिळाला आहे. 2021 मध्ये आलेल्या या चित्रपटाने अल्लू अर्जुनची क्रेझ जगभरात पसरवली होती. या चित्रपटाचा सिक्वेलही लवकरच प्रदर्शित होणार आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार पंकज त्रिपाठी यांना मिळाला. कृती सेननच्या ‘मिमी’ चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. सरोगसीवर आधारित या चित्रपटातील पाकंजच्या उत्कृष्ट अभिनयाचे कौतुक झाले.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना त्यांच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संपादकाचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शनही भन्साळी यांनीच केले आहे. सरदार उधम सिंहने हिंदी फीचर चित्रपट पुरस्कार जिंकला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केले होते. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनचा पुरस्कार हा मराठी चित्रपट गोदावरीचा दिग्दर्शक निखिल महाजनला प्रदान करण्यात आला आहे. गेल्यावर्षी देखील राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांनी बाजी मारली होती.

पुरस्कार विजेत्यांची यादी-

सर्वोत्कृष्ट हिंदो सिनेमा- सरदार उधम

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा- एकदा काय झालं

सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफी- आरआरआर (तेलुगू)

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- आरआरआर (तेलुगू)

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- पुष्पा

सर्वोत्कृष्ट एडिटर- गंगूबाई काठियावाडी

सर्वोत्कृष्ट गायिका- श्रेया घोषाल

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी) आणि क्रिती सेनॉन (मीमी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता- अल्लू अर्जून (पुष्पा)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- निखिल महाजन ( गोदावरी )

सर्वोत्कृष्ट चित्रपट- ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’

अधिक वाचा-
मंगळागौरीसाठी जुई गडकरीचा खास मराठमोळा लुक, पाहा फोटो
प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक; अभिनेते म्हणाले, ‘बाबा तुम्ही जातानाही आम्हाला…’

हे देखील वाचा