बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही खूप प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिचे अनेक चित्रपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. नुकताच या अभिनेत्रीच्या ‘आरआरआर’ (RRR) या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला आहे. आलिया भट्टचा हा पहिला दक्षिण भारतीय चित्रपट असणार आहे. दरम्यान, तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती सारा अली खानच्या (Sara Ali Khan) भावाला रिजेक्ट करताना दिसत आहे.
आलियाचा व्हिडिओ झाला व्हायरल
आलिया भट्टने नुकताच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती करीना कपूरची (Kareena Kapoor) नक्कल करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आलिया करीनाच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील एका डायलॉगवर अभिनय करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आलिया करीनाप्रमाणेच रुबाब दाखवत आहे. व्हिडिओमध्ये आलिया ‘पू’ बनली आहे आणि तिच्यासमोर मुलांची एक लाईन लागलेली दिसत आहे. विशेष म्हणजे, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानही (Ibrahim Ali Khan) या लाईनमध्ये उभा दिसतोय, तर शेवटी रणवीर सिंगही (Ranveer Singh) या लाईनमध्ये उभा आहे. (alia bhatt rejected saif ali khan son ibrahim ali khan video gone viral)
करीनानेही केलं कौतुक
या व्हिडिओवर करीना कपूरने आलिया भट्टचे कौतुक केले आहे. करीनाने हा व्हिडिओ रिशेअर करत लिहिले आहे की, “पू, पेक्षा उत्तम कोणीही नाही, आमच्या काळातील अप्रतिम अभिनेत्री, माझी प्रिय आलिया.” आलिया, रणवीर सिंग आणि इब्राहिम अली खान यांच्याशिवाय करीनाने या पोस्टमध्ये करण जोहरलाही (Karan Johar) टॅग केले आहे. रणबीर कपूरसोबतच्या लग्नामुळे चर्चेत असलेली आलिया भट्ट लवकरच करीनाच्या कुटुंबाचा भाग होणार आहे.
आलियाचे चित्रपट
आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच एसएस राजामौली यांच्या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ज्यामध्ये ती अभिनेता राम चरणसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’मध्येही दिसणार आहे. आलियाने अलीकडेच तिच्या ‘जी ले जरा’ या नवीन चित्रपटाची घोषणा केली, ज्यात प्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कैफ देखील दिसणार आहेत. तसेच आलिया रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :