पारंपरिक वेशभूषेत कमाल दिसणाऱ्या आलियाच्या किलर स्माईलवर नेटकरी फिदा, गालावरच्या खलीने घातली सुंदरतेत भर


बॉलिवूडमधील अभिनेत्री नेहमीच त्यांच्या सौंदर्यचा जलवा प्रेक्षकांवर फिरवताना दिसतात. या अभिनेत्री त्यांचे वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करतात आणि त्यांचे फोटोशूटमधील फोटो नेहमीच व्हायरल होताना दिसतात. नेहमीच वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्री जेव्हा जेव्हा भारतीय पारंपरिक वेशभूषेत दिसतात तेव्हा नक्कीच त्या संपूर्ण लाईमलाइट स्वतःकडे आकर्षित करून घेतात. इंडियन एथनिक लूकमध्ये त्यांचे सौंदर्य एका वेगळ्याच पातळीवर असते. सध्या बॉलिवूडची बबली गर्ल आलिया भट्ट अशाच तिच्या पारंपरिक लूकमुळे खूपच चर्चेत आली आहे.

आलिया लवकरच राजामौली यांच्या “आरआरआर” सिनेमात दिसणार असून, या सिनेमाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. या सिनेमात आलियाच्या लूक आणि तिच्या भूमिकेची छोटीशी झलक आपल्याला चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळाली. सिनेमाचा ट्रेलर सर्वत्र तुफान गाजत असून आलियाचा लुकदेखील खूपच चर्चेत आला आहे.

आलियाने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे काही साडीमधील फोटो पोस्ट केले आहेत. या लूकमध्ये आणि साडीमध्ये आलिया कमाल दिसत असून, सध्या सर्वत्र तिच्या या लूकची चर्चा होत आहे. हिरव्या रंगाच्या साडीमध्ये दिसणाऱ्या आलियाने कानात आकर्षक झुमके, केसांचा अंबाडा त्यावर गजरा घातला असून, कपाळावर लावलेल्या टिकलीने तिने तिचा हा लूक पूर्ण केला आहे. अतिशय सुंदर दिसणाऱ्या आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यावर भरभरून कमेंट्स देखील येत आहेत.

आलिया नेहमीच तिच्या लुकसोबत वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. इंडियन असो किंवा वेस्टर्न प्रत्येक लूक ती अतिशय आत्मविश्वासाने कॅरी करते. आलिया नेहमीच तिच्या कपड्यांइतकेच महत्व आणि लक्ष तिच्या मेकअपवर देते. आजपर्यंत आलिया कधीही कोणत्याही ठिकाणी ओव्हर मेकअपमध्ये दिसून आलेली नाही. तिच्या प्रत्येक लुकसोबत आलियाची किलर स्माईल आणि लक्षवेधी खाली नेहमीच प्रेक्षकांना घायाळ करताना दिसते.

आलियाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच ती राजामौली यांच्या ‘आरआरआर’ ह्या मोठ्या सिनेमात दिसणार असून, नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाची आणि अलाईच्या भूमिकेची सर्वत्र जोरदार चर्चा असून, या चित्रपटाच्या निमित्ताने ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. हा चित्रपट येत्या ७ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!