अल्लू अर्जुनच्या भावाची बॉडी पाहिली का? अभिनेत्याने केला वर्कआऊट व्हिडिओ शेअर


सुपरस्टार अल्लू अर्जुनचा भाऊ आणि तेलुगु स्टार अल्लू सिरीश हा त्याच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत असतो. तो अनेकवेळा सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसाठी वर्कआऊट करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. एवढंच नाही, तर तो त्याच्या चाहत्यांना देखील फिट राहण्याच्या सल्ला देत असतो. अनेकजण त्याचे हे व्हिडिओ पाहून प्रेरित होत असतात. नुकताच त्याने त्याच्या चाहत्यांसाठी जिममधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. (allu Sirish share his work out video on social media, fans get inspire from him)

या व्हिडिओमध्ये त्याची टोन्ड बॉडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याने त्याचा 30 सेकंदाचा वर्कआऊट व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून सर्वांचे लक्ष त्याच्या फिटनेसवर खिळले आहे. ही पोस्ट करून त्याने लिहिले आहे की, “अजून मला माझ्या फिटनेस गोलपर्यंत पोहोचायचे आहे. ट्रेनिंग डे. एक शॉर्ट व्हिडिओ सीरिज आहे. जिथे मी तुम्हा सर्वांना यात्रेला घेऊन जाणार आहे. सोबत चला #astrainingday #backworkout.”

अल्लू सिरीशचा हा 30 सेकंदाचा व्हिडिओ त्याची फिटनेस जर्नी दाखवत आहे. यानंतर देखील तो त्याचे दररोज करत असणारे रूटीन शेअर करणार आहे. या व्हिडिओमध्ये तो वर्कआऊट करत आहे. यात साफ दिसत आहे की, तो जिममध्ये किती मेहनत घेतो.

मागील काही दिवसात अल्लू सिरीशने त्याच्या चाहत्यासोबत हे शेअर केले होते की, तो दिवसभर कामात खूप व्यस्त असतो. त्याला आराम करायला देखील कसाबसा वेळ मिळतो. त्याने त्याच्या ऑफिसमधील काही फोटो देखील शेअर केले होते. जिथे कॅरमबोर्ड ठेवलेला दिसत होता. यासोबतच त्याने बाल्कनीमधील एक झलक दाखवली होती. यात तो आणि त्याचे मित्र कॅरम खेळताना दिसत होते. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले होते की, “ऑफिसमध्ये काम संपल्यावर मी हे करतो.”

त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, अल्लू सिरीशने 30 मेला त्याच्या वाढदिवशी त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. ज्याचे नाव ‘प्रेम कदंता’ हे असणार आहे. राकेश शशी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अजून समोर आली नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मलायकाला पाहून अर्जुनने दिली होते फॅनसारखी रिऍक्शन; थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल

-‘माझ्या मनासारखा म्हणजेच असा’, म्हणत ‘बाहुबली’वर प्रेम व्यक्त करताना दिसली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री

-‘मला जबरदस्तीने प्रेग्नंट करू नका, होईल तेव्हा पेढे वाटेल’, प्रेग्नंसीच्या वृत्तांवर पूनम पांडेने सोडले मौन


Leave A Reply

Your email address will not be published.