वाईट कर्माची फळं भोगावीच लागतात! अमेरिकन अभिनेत्रीला ३ वर्षांचा तुरुंगवास; मुलींना लैंगिक संबंध ठेवायला पाडायची भाग


मनोरंजन क्षेत्रातील कलाकार हे नेहमीच समाजाचे प्रतिनिधित्व करत असतात. समाजाला योग्य संदेश देण्याचे काम कलाकार करतात. मात्र, जेव्हा हेच कलाकार त्यांचे खरे काम विसरून चुकीच्या मार्गाने जातात तेव्हा काय? पैशाची हाव किंवा प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचा गर्व यालाच बळी पडून कलाकार चुकीच्या मार्गाला जातात. तसेच अनेक चुकीचे गुन्हे त्यांच्याकडून घडतात. याला बॉलिवूडमधील किंवा हॉलिवूडमधील कलाकार सर्वच बळी पडतात.

हॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री एलिसन मॅकला तिच्या एका मोठ्या गुन्ह्यासाठी तीन वर्षांचा तुरुंगवास झाला आहे. एलिसनवर मुलींना जबरदस्ती लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप एलिसावर लावण्यात आला आहे. या व्ययसायात मुलींना बळजबरी चालण्याचा आरोपही तिच्यावर केला गेला आहे. या आरोपांवर ब्रुकलिनच्या न्यायालयात सुनावणी करण्यात आली. असे सांगण्यात येत आहे की, २९ सेप्टेंबरपासून एलिसनच्या शिक्षेला सुरुवात होणार आहे. शिक्षेच्या सुनावणीनंतर एलिसनने कोर्टात सांगितले की, तिला तिच्या चुकांवर पश्चाताप होत आहे, आणि आयुष्यभर ती या चुकीसाठी स्वतःला दोष देईल.

शिक्षेच्या सुनावणीआधी एलिसनने पीडितांच्या परिवाराला आणि पीडितांना सांगितले की, एकत्र कुटुंबात राहूनही तिच्या हातून झालेले गुन्हे अक्षम्य, अपमानजनक, घृणास्पद आहेत. सोबतच ती हे सुद्धा म्हणाली की, तिने एनएक्सआईव्हीएम (NXIVM) नेता असलेल्या किथ रेनायर याला देखील सोडले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याला ही यौन तस्करीच्या गुन्ह्याच्या अंतर्गत १२० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

किथने NXIVM नावाची एक संस्था तयार केली आणि यात तो सोडून सर्व स्त्रिया होत्या. या संस्थेत महिलांसोबत जनवारांसारखे वागले जायचे. या महिलांना जबरदस्तीने किथसोबत शारीरिक संबंध ठेवायला सांगितले जायचे. यात एलिसन त्याला मदत करायची आणि मुलींना तस्करीच्या धंद्यात ढकलून द्यायची.

तत्पूर्वी एलिसन मॅक डब्ल्यूबी टेलीविजन सीरीज ‘स्मॉलविले’ या कार्यक्रमातून प्रसिद्ध झाली होती. एलिसन बहुतकरून वेबसीरिजमध्ये जास्त काम करायची. सोबतच तिने अनेक बोल्ड सीन्स देखील दिले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.