Thursday, June 12, 2025
Home बॉलीवूड दुर्गाष्टमीनिमित्त बिग बींसह पूजा करताना दिसल्या जया, काजोलनेही मुलगा युगसह लावली हजेरी

दुर्गाष्टमीनिमित्त बिग बींसह पूजा करताना दिसल्या जया, काजोलनेही मुलगा युगसह लावली हजेरी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य शासनाने निर्बंधांवर थोडी शिथिलता दिल्याने सर्वजण आनंदात आणि उत्साहामध्ये दसरा साजरा करत आहेत. अशात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी नवरात्रीनिमित्त देवीची मनोभावे आराधना आणि सेवा केली. अशाच कलाकार दसरा देखील साजरा करताना दिसत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री काजोल, बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते बिग बी अर्थातच अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांचा दसऱ्या निमित्त पूजेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दुर्गा पूजा सुरू आहे. यावेळी येथे अमिताभ बच्चन, काजोल, जया बच्चन आणि काजोलचा मुलगा युग देवगण देखील उपस्थित आहे.
या पूजेचे आयोजन सर्बोजनीन दुर्गा पूजा समितीने केले आहे.

व्हिडिओमध्ये बिग बी आपल्या साध्या वेशात दिसत आहेत. त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तसेच जया बच्चन यांनी देखील पांढऱ्या रंगाची आणि लाल काठाची साडी नेसली आहे. अभिनेत्री काजोल तर खूप सुंदर दिसत आहे. तिने यावेळी ट्रेडिशनल लूक केला आहे. तिने देखील पिवळ्या रंगाची आणि हिरवी करणार असलेली साडी नेसली आहे.

https://www.facebook.com/watch/?v=428508702035163

सर्व जण देवीची मनोभावे पूजा करत आहेत. या सर्व कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास बिग बी सध्या ‘कौन बनेगा करोडपती’चे सूत्रसंचलन करत आहेत. तसेच अभिनेत्री काजोल ही ‘द लास्ट हर्ष’मध्ये लवकरच झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग झाले असून प्रिप्रोडक्शनचे काम सुरू आहे. तिने आजवर या सिनेसृष्टीला अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. ‘कुछ कुछ होता है’, ‘फना’, ‘दिलवाले’, ‘कभी खुशी कभी गम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने दमदार अभिनय केला आहे.

काही दिवसांपूर्वीच काजोल आणखीन एका दुर्गा पूजेमध्ये दिसली होती. त्यावेळी तिने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तेव्हा देखील अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काजोलने घेतले मुलगा युगसोबत माँ दुर्गाचे दर्शन, तनिषा आणि दिग्गज अभिनेत्री तनुजा देखील झाल्या स्पॉट

-दुर्गा पूजेदरम्यान ‘लालपरी’ बनत काजोलने वेधले सर्वांचेच लक्ष

-Video: दुर्गा पूजेदरम्यान काजोल भावुक; काकांना मिठी मारत लागली रडू

हे देखील वाचा