अमिताभ बच्चन यांनी केला हार्ले डेव्हिडसन बाईक चालवातानाचा झक्कास फोटो शेअर; नातीची आली ‘कूल’ कमेंट


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन म्हणजे उत्साहाचा सळसळता झरा आहे. वयाची सत्तरी पार होऊनही अमिताभ यांच्यामध्ये २५/३० मधील तरुणांसारखाच उत्साह आहे. अभिनय, शिस्त आदी अनेक बाबींमध्ये अमिताभ हे नेहमी अग्रेसर असतात. आजच्या तरुणाईच्या खांद्याला खांदा लावून चालण्यासाठी अमिताभ यांनी अनेक बाबी अंगिकारल्या आहेत. सोशल मीडिया हे त्याचेच एक उदाहरण आहे. सोशल मीडियावर अमिताभ खूप सक्रिय आहेत. ते दिवसभर कितीही व्यस्त असले, तरीही रात्री झोपण्यापूर्वी ते सोशल मीडियावर त्यांच्या फॅन्ससाठी अपडेट टाकायला विसरत नाहीत. सध्या महानायक त्यांच्या आगामी ‘गुडबाय’ या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. ते चित्रपटाच्या सेटवरून नेहमी शूटिंगचे आणि थ्रोबॅक फोटो पोस्ट करत असतात.

अमिताभ बच्चन यांनी नुकताच त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक कूल फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अमिताभ हार्ले डेव्हिडसन या बाईकवर बसून रायडिंगचा आनंद घेत आहेत. त्यांनी काळ्या रंगाचे जॅकेट आणि निळ्या रंगाचा चष्मा लावला असून या कूल अवतारात बाईकवर बसले आहेत. हा फोटो पोस्ट करताना अमिताभ यांनी लिहिले की, “हार्ले चालवण्याचे आपले एक जग आहे.”

अमिताभ यांच्या या फोटोवर फॅन्स तर फॅन्स कलाकार देखील जोरदार कमेंट्स करत आहेत. या कमेंट्समध्ये अमिताभ यांची नात नव्या नवेली नंदाच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने अमिताभ यांच्या या फोटोवर कमेंट करताना लिहिले, “सर्वात कूल.”

याआधी अमिताभ यांनी त्यांच्या ‘गुडबाय’ सिनेमाच्या सेटवरून एक फोटो शेअर केला होता. तो फोटो देखील खूप व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये ते त्यांच्या को- स्टारचे कान खेचत होते. अमिताभ ज्या को- स्टारचे कान खेचत होते, तो दुसरा कोणी नसून अमिताभ यांचा गोल्डन रिट्रीवर डॉग आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले होते की, “माझा को स्टार… गोष्ट कोणतीही असो याचे कान नेहमी उभे राहतात.”

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर ते ‘गुडबाय’ सिनेमाव्यतिरिक्त, दीपिका पदुकोणसोबत ‘द इंटर्न’, इमरान हाश्मीसोबत ‘चेहरे’, रणबीर-आलियासोबत ‘ब्रह्मास्त्र’ आणि अजय देवगणच्या ‘मेडे’मध्ये दिसणार आहेत. मुख्य म्हणजे ते नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’मध्ये देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.