×

आपल्या प्रेग्नेंट पत्नीकडे बोट दाखवून व्यक्तीने अमृताकडे केली ‘अशी’ मागणी, ऐकून चकित झाली होती अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) आणि आरजे अनमोल सध्या त्यांच्या हनीमून अल्बममध्ये व्यस्त आहेत. या स्टार कपलने अलीकडेच त्यांच्या ‘कपल ऑफ थिंग्स’ या यूट्यूब चॅनलवर त्यांचा हनिमून अल्बम शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या हनिमूनचे फोटो आणि काही व्हिडिओ क्लिप चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. लग्नानंतर हे जोडपे बालीमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. शिवाय व्हिडिओमध्ये त्यांनी एक मजेशीर किस्साही शेअर केला आहे.

हनीमूनवर व्यक्तीने केली ‘ही’ मागणी
या व्हिडिओमध्ये जोडप्याने सांगितले की, हनीमून दरम्यान एक व्यक्ती अमृताच्या सौंदर्याने इतका प्रभावित झाला होता की, त्याने अमृतासोबत काही क्षण घालवण्याची मागणी केली होती. त्यांच्या हनीमूनची एक क्लिप शेअर करत अनमोलने अमृताला सांगितले की, “तो एक सुंदर क्षण होता.” चाहत्यांना क्लिप दाखवण्यापूर्वी अनमोल म्हणाला, “त्याच्या कुटुंबासोबत एक स्थानिक माणूस आला होता. त्याची पत्नी गरोदर होती. तो आमच्याकडे आला, अमृताकडे बोट दाखवून असे बोलू लागला.” (amrita rao reveals at her honeymoon one unknown man comes to her and demanded this)

प्रेग्नेंट होती त्याची पत्नी
यानंतर अनमोलने एक क्लिप चालू केली, ज्यामध्ये एक माणूस तिच्याशी बोलत होता आणि पत्नीकडे आणि नंतर अमृताकडे बोट दाखवत होता. “ती गरोदर आहे”, असे तो माणूस आपल्या बायकोकडे बोट दाखवत म्हणाला. त्याला त्याच्या मुलाला अमृतासारखे सुंदर पाहायचे होते. व्हिडिओमध्ये अमृता हसताना आणि मान हलवताना दिसत आहे.

क्लिप संपल्यानंतर अमृता चाहत्यांना म्हणाली, “त्यांना माहित नव्हते की मी एक अभिनेत्री आहे. पण त्यांना माझा चेहरा आवडला. ती गर्भवती महिला होती, कदाचित त्यांच्या परंपरेत असे आहे की, जर एखाद्या गर्भवती महिलेला सुंदर बाळ हवे असेल, तर तिने एका सुंदर महिलेला पाहावे. त्याने येऊन मला त्याच्यासोबत थोडा वेळ घालवण्याची विनंती केली. हे माझ्यासाठी खूप छान होते.”

अमृता आणि आरजे अनमोल यांनी त्यांचा व्लॉगही यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये त्याने आपल्या हनिमूनचे एकामागून एक सुंदर फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांना दाखवले आहेत. संपूर्ण व्लॉगमध्ये अमृता आणि अनमोलची केमिस्ट्री चांगलीच दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post