अनिल कपूर यांचा नादच खुळा! वयाच्या ६४ व्या वर्षी धावले ट्रॅकवर; कलाकारांकडून होतंय कौतुक


कलाकार कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत येतील, याचा काही नेम नसतो. सोशल मीडिया सध्या कलाकारांचे आवडीचे माध्यम झाले आहे. जवळपास सर्वच कलाकार त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असतात. शिवाय याच सोशल मीडियावरील पोस्ट फॅन्समध्ये देखील नेहमी गाजतात. आजच्या काळात सोशल मीडिया खूप महत्वाचे आणि सर्वात जास्त लाईमलाईट देणारे माध्यम झाले आहे. या सोशल मीडियाची भुरळ फक्त आजच्या पिढीतील कलाकारांचं आहे असे अजिबात नाही. जुन्या पिढीतील कलाकार देखील या माध्यमाच्या प्रेमात असतात.

आता एव्हरग्रीन अभिनेते म्हणून ओळखले जाणाऱ्या अनिल कपूर यांचेच बघा. वयाची साठी पार करूनही त्यांचा फिटनेस, स्टॅमिना आजच्या कलाकारांना प्रेरणा देणारा ठरतो. बॉलिवूडमध्ये त्यांच्या अनोख्या ऍक्टिंग स्टाईलमुळे चर्चेत असणाऱ्या अनिल कपूर यांनी नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांना आपण पाहिल्यावर त्यांचे वय नक्की साठच आहे ना? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.

या व्हिडिओमध्ये अनिल कपूर ट्रॅकवर जोरात पळताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये आपल्याला एक आवाज देखील ऐकायला येत आहे, जो अनिल कपूर यांना पळण्यासाठी प्रेरित करताना ऐकायला येत आहे. हा आवाज आहे अनिल कपूर यांच्या ट्रेनरचा. अनिल कपूर यांचा हा व्हिडिओ तुफान वेगात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांना खूपच आवडत आहे. वयाच्या ६४ व्या वर्षी अनिल कपूर यांना या जोशात पळताना अनेकांना प्रेरणा मिळणार हे नक्की.

अनिल कपूर यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले, “ऍक्शनमध्ये पळणे, पुन्हा ट्रॅकवर येऊन मी खूप आनंदित आहे. टोकियोमध्ये आपल्या भारतीय खेळाडूंपासून प्रेरित आहे, जे संपूर्ण देशाला गौरवान्वित करत आहेत.”

त्यांच्या या व्हिडिओवर फराह खान, नील नितीन मुकेश यांसारख्या कलाकारांनी कमेंट करत अनिल कपूर यांची प्रशंसा केला आहे. दुसरीकडे एका युजरने कमेंट करत लिहिले की, “ऑलिंपिकमध्ये जाण्याची तयार आहे का सर?” तसेच आणखी एका युजरने कमेंट केली की, “तुमचा नादच खुळा.”

विशेष म्हणजे २३ जुलैपासून टोकियोमध्ये ऑलंपिकच्या स्पर्धा सुरू होणार आहेत. मागच्या वर्षी होणाऱ्या या स्पर्धा कोरोनामुळे यावर्षी घेण्यात येणार आहेत.

अनिल कपूर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ते काही महिन्यांपूर्वी अनुराग कश्यप यांच्या ‘एके वर्सेज एके’ चित्रपटात दिसले होते. आगामी काळात ते ‘जुग जुग जियो’ या सिनेमात दिसणार असून, यात वरुण धवन, कियारा आडवाणी, नीतू सिंह देखील अनिल कपूर यांच्यासोबत दिसणार आहेत. शिवाय ते रणबीर कपूर, परिणीति चोप्रा, बॉबी देओल यायच्या ‘ऍनिमल’ सिनेमातही दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट’ म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या आदित्यला सीआयडीच्या ‘अभिजीत’ने मिळवून दिली घराघरात ओळख

-रात्री उशिरापर्यंत शूटिंग करताना ‘बिग बीं’ची ‘अशी’ झाली अवस्था; म्हणाले, ‘असंच होतं, जेव्हा…’

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Leave A Reply

Your email address will not be published.