Saturday, April 18, 2026
Home बॉलीवूड अनुपम खेर यांच्या ‘त्या’ फोटोने वेधले सर्वांचे लक्ष; नेटकरी म्हणाले, ‘हेअर स्टाईल छान आहे’

अनुपम खेर यांच्या ‘त्या’ फोटोने वेधले सर्वांचे लक्ष; नेटकरी म्हणाले, ‘हेअर स्टाईल छान आहे’

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. अनेक तरुण कलाकारांना मागे टाकत ते सोशल मीडियाचा वापर करतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टला नेहमी चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळत असतो. अशातच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे. या फोटोचे कॅप्शन आणि त्यावर येणाऱ्या कमेंट सध्या जोरदार चर्चेत आहेत.

अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, त्यांनी ब्लेझर घातले आहे. हा फोटो शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, “मला हा फोटो खूप आवडला, आशा करतो की, तुम्हाला देखील आवडेल.” त्यांच्या चाहत्यांना हा फोटो खूपच आवडला आहे. अनेकजण या फोटोवर सातत्याने त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. (Anupam Kher share his new look photo on social media)

अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत २४ हजारांपेक्षाही जास्त लाईक्स आले आहेत. तसेच कमेंट्स देखील येत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “तुमची हेअरस्टाईल खूप छान आहे.” आणखी एकीने लिहिले आहे की, “तुमची हेअर स्टाईल आवडली. माझ्या पतीची हेअर स्टाईल देखील तुमच्यासारखी आहे.” तसेच बाकी अनेक चाहते त्यांच्या या लूकचे कौतुक करत आहेत.

अनुपम खेर नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असतात. या आधी त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी लिहिले होते की, “जिथंपर्यंत रस्ता दिसतोय तिथंपर्यंत चालत रहा, तिथे पोहचल्यावर पुढचा रस्ता शोधता येईल.” त्यांच्या या पोस्टला देखील भरभरून प्रतिसाद मिळाला होता.

अनुपम खेर हे एक नावाजलेले अभिनेते आहेत. त्यांनी केवळ देशातच नव्हे, तर अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष झालेले पद्मश्री अनुपम खेर यांना आठ वेळा वेगवेगळ्या श्रेणीमध्ये फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. शिवाय त्यांना दोन वेळा राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने देखील नावाजले गेले होते

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तारक मेहता’च्या जेठालालने वाढवली स्पॅनिश पत्रकाराची लोकप्रियता, फोटो शेअर करताच ट्विटरवर वाढले फॉलोव्हर्स

-सोनू सूदला भेटण्यासाठी चाहत्याने बिहारपासून केला सायकलवर प्रवास, अभिनेत्याने फोटो शेअर करून मानले आभार

-अक्षय कुमारने ‘अतरंगी रे’चे मोशन पोस्टर्स केले शेअर, धनुष-साराच्या भूमिकेचा झाला खुलासा

हे देखील वाचा