बॉलिवूड चित्रपट निर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असताना दिसते. ती तिच्या यूट्यूब व्हिडिओमुळे नेहमीच सर्वत्र चर्चेत असते. आलिया या दिवसात तिचा बॉयफ्रेंड शेन याला डेट करत होती. ती नेहमी त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. पण मागील काही दिवसांपासून तिने सोशल मीडियावर त्या दोघांचा फोटो शेअर केला नाही. त्यामुळे त्या दोघांचे ब्रेकअप झाले की काय याबाबत सर्वत्र चर्चा चालू आहे.
आलिया कश्यपने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या आणि तिला तिच्या ब्रेकअपबद्दल विचारले होते. युजरने तिला विचारले की, “तुझा आणि शेनचा ब्रेकअप झाला आहे का? तुम्ही दोघं आता सोबत दिसत नाही.”
यावर आलियाने उत्तर दिले की, “नाही आमचे ब्रेकअप नाही झाले पण तो आता खूप प्रवास करतो ना त्यामुळे जास्त भेट होत नाही आणि जेव्हा आम्ही भेटतो, तेव्हा व्हिडिओ बनवण्याऐवजी त्याच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवते. पण मी लवकरच त्याच्यासोबत एक नवीन व्हिडिओ पोस्ट करणार आहे.”
आलियाने हे उत्तर दिल्यानंतर त्या कमेंटला पिन करून ठेवले. ही कमेंट पिन केल्यानंतर तिने लिहिले की, “मी या कमेंटला पिन करत आहे, कारण मागच्या 2 आठवड्यापासून मला सगळेजण सारखा हाच प्रश्न विचारत आहेत.” यावर एक युजरने कमेंट केली आहे की, “तुम्ही एकमेकांना डेट करता म्हणजे तुम्ही एकत्र राहिलंच पाहिजे असं नाहीये.” या कमेंटला आलियाने लाईक देखील केले आहे.
आलियाने केवळ इंस्टाग्रामवर नाही तर यूट्यूबवर देखील शेनसोबत अनेक व्हिडिओ पोस्ट करून त्यांच्या नात्याचा खुलासा केला आहे. यात तिने सांगितले आहे की, ती कशाप्रकारे शेन सोबत असलेले तिचे नाते सांभाळते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-फक्त २५० रुपये होता ‘दयाबेन’चा पहिला पगार; रक्कम मिळताच ठेवली होती ‘या’ व्यक्तीच्या हातावर
-यो यो हनी सिंगने केला आई- वडिलांचा वाढदिवस साजरा, फोटोला मिळाले ४ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स