बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचा पती आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हे नेहमीच त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतेच या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात या जोडप्याने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिचे नाव त्यांनी वामिका असे ठेवले आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर अनुष्काने तिला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तिने अजूनही तिच्या मुलीचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला नाही.
तसेच तिचा पती आणि क्रिकेटर विराट कोहली जोरदार चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० वर्ल्डकप २०२१ मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताला अपयश आल्याने सोशल मीडियावर त्याला जोरदार ट्रोल केले जात आहे. त्याच्या कर्णधारपदावर देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. एवढंच नाही, तर अनुष्का आणि विराटच्या १० महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या देखील धमक्या येऊ लागल्या आहेत. यामुळे अनेकजण याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. आता या प्रकरणात दिल्ली महिला आयोग देखील सक्रिय झाला आहे. यासाठी दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस देखील पाठवली आहे. तसेच, या धमक्या देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. (Anushka Sharma and virat kohli daughter receives assault threats now delhi commission for women take action)
महिला आयोगाने या नोटीसची प्रत त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. त्यांनी ही प्रत पोस्ट करून लिहिले आहे की, “भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मुलीला ट्विटरवर शोषणाची धमकी मिळाल्यानंतर दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना नोटीस पाठवली आहे. डीसीडब्ल्यूच्या अध्यक्षा स्वाती मोतीलाल यांनी ही घटना अत्यंत लज्जास्पद आहे आणि आरोपींना अटक झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.”
भारतीय क्रिकेट टीम के कप्तान @imVkohli और @AnushkaSharma की बेटी को ट्विटर पर बलात्कार की धमकी मिलने के मामले में दिल्ली महिला आयोग ने भेजा पुलिस को नोटिस।DCW अध्यक्ष @SwatiJaiHind ने बताया घटना को शर्मनाक, आरोपी की गिरफ्तारी की मांग pic.twitter.com/qUEWeLeyLx
— Delhi Commission for Women – DCW (@DCWDelhi) November 2, 2021
या धमक्यांनंतर अजूनही विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मात्र, पाकिस्तानचा माजी खेळाडूने लोकांना त्यांच्या मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू इंजमाम उक हकने विराट कोहलीला पाठिंबा देत युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो म्हणतोय की, “मी असे ऐकले आहे की, विराट कोहलीच्या मुलीला धमक्या येत आहेत. लोकांना हे समजण्याची गरज आहे की, हा केवळ एक खेळ आहे. वेगवेगळे देश खेळतात मग तो पाकिस्तान असो किंवा भारत. जर तुम्हाला कोहलीचा खेळ आवडला नसेल, तर त्याबाबत बोलण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे. मात्र, मला असे वाटते की, त्याच्या कुटुंबाबद्दल बोलण्याचा कोणालाही कसलाच अधिकार नाही.”
सोशल मीडियावर हा विषय सध्या जोरदार चर्चेत आहे. अनेकजण सोशल मीडियावर विराट आणि अनुष्काला पाठिंबा देत आहेत आणि आरोपींना अटक व्हावे, अशी मागणी करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-रोमँटिक अंदाजात पोझ देत होते अक्षय अन् कॅटरिना, कपिल शर्मा बनला ‘कबाब में हड्डी’










