बॉलिवूड अभिनेत्री-निर्माती अनुष्का शर्मा (Anushka Sharma) लवकरच चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे. अभिनेत्री शेवटची ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती. आता ती तीन वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का शर्माने बॉलिवूडचे तीन मोठे प्रोजेक्ट्स साइन केले आहेत. यापैकी दोन चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकतात, तर एक ओटीटीसाठी असेल.
‘या’ प्रोजेक्टद्वारे करणार डिजिटल पदार्पण
ओटीटीवर प्रदर्शित होणारा अनुष्का शर्माचा हा चित्रपट भारतातील डिजिटल प्लॅटफॉर्मवर बनवला जाणारा सर्वात मोठा चित्रपट असेल, असा दावाही रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. या बॉलिवूड प्रोजेक्ट्सची घोषणा पुढील वर्षाच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. (anushka sharma to make her much awaited comeback signed 3 big budget projects)
होऊ शकतो मोठा धमाका
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का शर्माच्या अभिनय कौशल्य आणि अष्टपैलुत्वामुळे या प्रोजेक्ट्सबाबत चित्रपटसृष्टीत बरीच चर्चा आहे. निर्मात्यांना आशा आहे की, अनुष्का शर्मामुळे प्रोजेक्ट्सच्या घोषणेमुळे मोठी चर्चा होऊ शकते. रिपोर्ट्समध्ये असा दावाही केला जात आहे की, अनुष्काच्या चित्रपटांची निवड प्रेक्षकांना काहीतरी नवीन आणि फ्रेश दाखवण्याचा प्रयत्न करेल.
नावावर केलाय ‘हा’ विक्रम
अनुष्का ही एकमेव अभिनेत्री आहे, जिच्याकडे तीन (सुलतान, पीके आणि संजू) चित्रपट आहेत ज्यांनी बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता वामिका एक वर्ष मोठी झाली असताना, अनुष्का रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यास तयार आहे असे दिसते!
निर्माती म्हणून रिलीझ केलेत ‘हे’ चित्रपट
अभिनयाव्यतिरिक्त, अभिनेत्रीने ‘पाताल लोक’, ‘बुलबुल’, ‘माई’, ‘काला’ यासारख्या चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. तिने स्वतः निर्मिती केलेल्या ‘एनएच १०’, ‘परी’ आणि ‘फिल्लौरी’मध्ये देखील काम केले आहे.
हेही वाचा-
- आलिया भट्टने उघड केली रणबीर कपूरची सुपर पॉवर, राग येण्याच्या प्रश्नावर पाहा काय म्हणाली अभिनेत्री
- रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपवर सुष्मिता सेनचे मोठे वक्तव्य; म्हणाली, ‘मी माझ आयुष्य उद्ध्वस्त केलंय…’
- मल्लिका शेरावतच्या गोल्डन ड्रेसमधील फोटोने लावली सोशल मीडियावर आग, चाहतेही म्हणाले, ‘हॉलिवूड स्टाईल…’
हेही पाहा-