Tuesday, April 16, 2024

एकेवेळी सिगारेटच्या प्रचंड आहारी गेलेले बॉलीवूड कलाकार, आज समाजासाठी झालेत आदर्श व्यक्ती

बॉलिवूड स्टार्स आपल्या अभिनयाने सगळ्यांच्या मनावर राज्य तर करतातच पण काही प्रेक्षक याच स्टार्सना त्यांचे प्रेरणस्थान देखील मानतात. असे अनेक प्रेक्षक आहेत जे कालाकरांकडून अनेक गोष्टीची प्रेरणा घेतात. काहीजण त्यांच्या काही सवयी अंगीकारतात तर काही जण त्यांची लाईफ स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. आज आपण काही अशाच कलाकरांबद्दल जाणून घेणार आहोत, जे एके काळी स्मोकिंगचे शिकार झाले होते. पण आता या सगळ्यांपासून ते खूपच लांब आहेत. त्या-त्या वेळी त्यांच्या या सवयीला अनेक कलाकार कॉपी देखील करत होते.

रजनीकांत
रजनीकांत यांना एकेकाळी सिगारेटचे व्यसन होते. त्यावेळी त्यांना खूपच शारारिक त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी हे व्यसन सोडून दिले. आता ते त्यांच्या सगळ्या चाहत्यांना सिगारेट न पिण्याचा सल्ला देतात.

कमल हासन
कमल हासन यांना वयाच्या 11 व्या वर्षीच सिगारेटचे व्यसन लागले होते. परंतु आता ते पूर्णपणे या व्यसनापासून लांब गेले आहेत. त्यांनी एकदा सांगितले होते की, त्यांची सिगारेट सोडण्याचे कारण त्यांची आई होती. त्यांच्या आईला या सगळ्या गोष्टी अजिबात आवडत नसे. त्यामुळे त्यांनी सिगारेट पिणे बंद केले. या व्यतिरिक्त त्यांनी चित्रपटातील लिपलॉक सीनमुळे सिगारेट सोडली असे देखील सांगितले होते.

विजय देवरकोंड
विजय देवरकोंडा हा देखील चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आहे. खरं तर त्याने त्याच्या आयुष्यात कधीच सिगारेटचे सेवन नाही केले. परंतु अर्जुन रेड्डी या चित्रपटासाठी त्याला सिगारेट घ्यावी लागली. परंतु त्याने या गोष्टीला कधी त्याची सवय होऊ दिले नाही.

महेश बाबू
तेलगू चित्रपटातील दिग्गज अभिनेता महेश बाबू याला देखील सिगारेटचे व्यसन लागले होते. परंतु एलन कार याचे एक पुस्तक वाचल्यानंतर त्याने हे व्यसन सोडून दिले. तो त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या आरंभी सिगारेट न पिण्याचा सल्ला देतो

राणा दग्गूबाती
राणा दाग्गूबाती यांनी एका चित्रपटासाठी सिगारेट घ्यायला सुरुवात केली आणि नंतर पुढे जाऊन ती त्यांची सवय झाली. पण काही दिवसांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याने सिगारेट सोडून दिली.

जयसुर्या
अभिनेता जयसुर्या हे एके काळी दिवसाला 10 सिगारेट घेत असत. परंतु नंतर याचा परिणाम त्यांच्या तब्बेतीवर व्हायला लागला आणि त्याने सिगारेट सोडून दिली.

हे देखील वाचा