आलिशान घरात राहायचंय? पॉप सिंगर लेडी गागा देतेय भाड्याने, वाचा किंमत…

lady gagas former new york city one bedroom apartment available to rent for 1 lakh 45 thousand a month


सेलिब्रिटींची आलिशान घरे पाहून आपण सर्वजण तोंडात बोटे घालतो. पण एखाद्या सेलिब्रिटीच्या घरात भाड्याने राहायची संधी मिळाली तर? तेही लेडी गागाचे घर! होय, प्रसिद्ध पॉप सिंगर लेडी गागा हिचे न्यूयॉर्कचे घर भाड्याने देण्यात येणार आहे. परंतु तिथे राहण्यासाठी तुम्हाला खिशे मोकळे करावे लागतील.

वन रूम फ्लॅटसाठी मोजावे लागतील दरमहा 1.45 लाख
लेडी गागा न्यूयॉर्क शहरच्या लोअर ईस्ट साईडमध्ये वन बेडरूम-वन बाथरूम फ्लॅटमध्ये राहत होती. पण आता ती या फ्लॅटसाठी भाडेकरू शोधत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की या वन बेडरूम फ्लॅटचे भाडे किती आहे? या घरात राहण्यासाठी तुम्हाला दरमहा 2000 डॉलर द्यावे लागतील. म्हणजेच आजच्या दराने दरमहा तब्बल 1,45,513 रुपये. याशिवाय तुम्ही ते 13 महिन्यांच्या लीजवर घेतल्यास, दोन महिन्यांच्या भाड्यात तुम्हाला सवलत मिळेल.

याच घरात गागाने बनवला होता ‘द फेम’ अल्बम
लेडी गागाचे हे जुने घर न्यूयॉर्क शहरातील 176 स्टँटन स्ट्रीटवर आहे. गागा येथे तीन वर्षे राहिली आहे. लेडी गागाने तिचा सुपरहिट अल्बम ‘द फेम’ इथेच बनवला होता. सूचीनुसार, हे अपार्टमेंट युद्धापूर्वी बनले आहे. याची सीलिंग 10 फूट उंचीवर आहे. या अपार्टमेंटमध्ये बर्‍याच खिडक्या आहेत.

सध्या या घरांची मालकीण आहे गागा
लेडी गागा यावेळी अनेक घरांची मालकीण आहे. कॅलिफोर्नियातील हॉलिवूड हिल्समध्ये तिचे एक घर आहे. ऑस्कर पुरस्कार विजेती गागाच्या हॉलिवूड हिल्सच्या घराची किंमत 5.25 दशलक्ष डॉलर आहे. म्हणजेच 38 कोटी 21 लाख 8 हजार 387 रुपये आहे. तिच्याकडे मलिबू बीचजवळीलही 22.5 दशलक्ष डॉलर्सचे घर आहे.

लेडी गागाचे दोन कुत्रे गेले होते चोरीला
लेडी गागा सध्या इटलीमध्ये राहत आहे. तिथे ती तिच्या आगामी चित्रपटाची तयारी करत आहे. यापूर्वी लेडी गागा तिच्या दोन कुत्र्यांच्या चोरीमुळे चर्चेत होती. काही चोरांनी तिच्या डॉग वॉकर रेयान फिशरला गोळी मारून तिचे दोन बुलडॉग घेऊन फरार झाले होते.

मात्र, नंतर पोलिसांनी लेडी गागाच्या कुत्र्यांचा शोध घेऊन त्यांना परत केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-परी म्हणू की सुंदरा..! पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मराठमोळी अभिनेत्री दिसतेय जणू स्वर्गातील अप्सरा

-शर्टलेस सलमान खानसोबतचा फोटो शेअर करून अर्पिता खानने दिला जुन्या आठवणींना उजाळा

-‘मिर्झापूर’ वेबसीरिजनंतर श्रिया पिळगावकर ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला, साकारणार पत्रकाराची भूमिका


Leave A Reply

Your email address will not be published.