Thursday, March 28, 2024

‘एक वर्ष लीव्ह इन रिलेशनमध्ये राहा, तरच तुमचं लग्न लावून देईल’ पाहा ट्विंकलच्या आईने कुणापुढे ठेवली होती ‘ही’ अट

मंडळी, आज बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना हीचा ४७ वा वाढदिवस आहे. ट्विंकलचा जन्म मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये १९७३ साली राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया खन्ना या दांपत्याच्या पोटी झाला. ट्विंकलने १२वी पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर चार्टर्ड अकाऊंटंट होण्याचा निर्णय घेतला. त्या बाजूने तयारी करायला सुरुवात करणार इतक्यात आई डिंपल आणि वडील राजेश खन्ना यांनी तिला अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा सल्ला दिला आणि केवळ त्यांच्या सांगण्यावरून ट्विंकलने १९९५ साली बॉबी देओल सोबत मुख्य भूमिका साकारत चित्रपट बरसातद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तिला एक अभिनेत्री म्हणून संमिश्र यश मिळत गेलं. मग तिच्या आयुष्यात अक्षय कुमार आला आणि सारं काही बदलून गेलं. तिच्या आणि अक्षयच्या याच लव्हस्टोरीबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

ट्विंकलची सुपरस्टार अक्षय कुमारसोबतची प्रेमकथा खूपच रंजक आहे. असे म्हणतात की, जेव्हा ट्विंकलचा ‘मेला’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा अक्षयने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यावेळी ट्विंकलचं उत्तर होतं हा की जर चित्रपट फ्लॉप झाला तर ती लग्न करेल. चित्रपट फ्लॉप झाला आणि दोघांनी एकमेकांसोबत लग्न केलं.

अक्षय आणि ट्विंकलची पहिली भेट एका फोटोशूट दरम्यान झाली होती. अक्षयच्या ट्विंकलसोबतच्या लग्नाच्या प्रस्तावावर आई डिंपल यांनी एक अट ठेवली होती की दोघांनाही वर्षभर लिव्ह-इनमध्ये राहावे लागेल. जर सर्व काही व्यवस्थित झालं तर आणि तरच त्या लग्नाला परवानगी देतील. अक्षय-ट्विंकल यांनी आई डिंपलच्या अटीनुसार वर्षभर लिव्ह इनमध्ये राहिले आणि त्यानंतर वर्षभरात त्यांनी लग्न केलं. जानेवारी २००१ मध्ये दोघांनी लग्न केलं. ट्विंकलने २००२ मध्ये मुलगा आरव याला जन्म दिला होता तर मुलगी निताराचा जन्म २०१२ मध्ये झाला होता. निताराच्या जन्माअगोदर ट्विंकलने अशी अट ठेवली होती की अक्षय चांगल्या चित्रपटांत काम करू लागला तरच ती दुसर्‍या मुलासाठी विचार करू शकते. अक्षयने देखील आपल्या पत्नीची आज्ञा पाळत चित्रपटांच्या निवडीबद्दल गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली.

अक्षय कुमार इंडस्ट्रीमधील एक असा स्टार आहे जो रात्री उशिरापर्यंत काम करत नाही आणि पहाटे चार वाजता उठतो आणि चौपाटीवर धावायला जातो. ट्विंकल देखील त्याच्या या दैनंदिनीनध्ये समर्थन करते. जेव्हा करण जोहरने त्याचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’ मध्ये ट्विंकलला विचारलं की अक्षयच्या या सवयीत आपल्याला येण्यास किती वेळ लागतो तेव्हा ती म्हणाली की मला लवकर झोपणे आणि लवकर उठणे हे खूप आवडतं. ट्विंकलने सांगितले की ती आणि अक्षय रोज रात्री रम्मी खेळत झोपतात.

या जोडीला एकत्र येऊन आज १९ वर्ष झाली आहेत, पण आजही ट्विंकलने तिचं आडनाव काही बदललेलं नाही. ती तिच्या नावाच्या मागे आपल्या आईवडिलांचे आडनाव खन्ना अजूनही लावते. लग्नानंतर खन्ना सोडून कुमार आडनाव का लावलं नाही? असा प्रश्न ट्विंकलला काही वर्षांपूर्वी एक व्यक्तीने सोशल मीडियावर विचारला होता. यावर तिने प्रत्युत्तर म्हणून आयुष्यभर खन्ना हेच आडनाव लावणार असल्याचं त्या व्यक्तीला खडसावलं. इतकी निर्भीड आणि धाडसी ट्विंकल ही आजमितीला एक लेखिका, स्वतंत्र इंटिरियर डिझायनर, वृत्तपत्रातील स्तंभलेखिका व एक यशस्वी चित्रपट निर्माती देखील आहे. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या ट्विंकलला दैनिक बोंबाबोंब कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

हे देखील वाचा