लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याने ‘अप्सरा’ सोनालीने शेअर केली खास पोस्ट; पडतोय शुभेच्छांचा पाऊस!

apsara sonalee kulkarni shared spacial post on occasion of one month wedding anniversary


गेल्या काही दिवसांपासून मराठमोळी सोनाली कुलकर्णी बरीच चर्चेत आहे. तिने अचानकपणे दुबईत लग्न करून, चाहत्यांना आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का दिला होता. सोनाली ७ मे २०२१ रोजी, कुणाल बेनोडेकरसह रेशीमगाठीत अडकली आहे. त्यांनी दुबईमध्ये अगदी साध्या पद्धतीने लग्न उरकून घेतले. केवळ २ साक्षीदारांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. लग्नानंतर या जोडप्याचे सुंदर फोटो समोर आले होते. नुकताच या गोड दाम्पत्याच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. या निमित्ताने सोनालीने एक खास फोटो शेअर केला आहे.

सोनालीने लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या खास निमित्ताने, एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती पती कुणालसोबत दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, यामध्ये दोघेही एका झोपाळ्यावर बसलेले आहेत. यात सोनालीने हलक्या सोनेरी रंगाचा फ्रॉक परिधान केला आहे. तर कुणालने निळ्या शर्टसह शॉर्ट्स घातले आहेत.

हा फोटो शेअर करून सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अधिकृतरित्या पती पत्नी होऊन १ महिना पूर्ण झाला.” या फोटोवर आता चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस पाडल्याचे दिसून येत आहे. नेटकरी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनेही सोनालीच्या फोटोवर कमेंट करून, “अभिनंदन” म्हटले आहे.

सोनालीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सोनाली अखेरच्या वेळेस ‘युवा डान्सिंग क्वीन’ या टीव्ही शोमध्ये, नृत्यदिग्दर्शक मयूर वैद्यसोबत जज म्हणून दिसली होती. ती ‘झिम्मा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर, ‘छत्रपती ताराराणी’ आणि ‘फ्रेश लाईम सोडा’ हे आगामी चित्रपटही तिच्या खात्यात आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.