मलायकापासून घटस्फोट घेतल्यानंतर ट्रोल होण्यावर बोलला अरबाज खान; आमिर- किरणच्या घटस्फोटावरही केली चर्चा


कलाकार आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील नाती, रिलेशनशिप याबद्दल फॅन्स आणि प्रेक्षकांमध्ये एक खास जागा असते. त्यांना आपल्या आवडत्या किंवा चांगल्या जोड्यांबद्दल ते खूपच पझेसिव्ह असतात. जेव्हा अशा जुन्या आणि खूप चांगल्या जोड्या अचानक तुटतात, तेव्हा त्या जोड्यांवर आणि त्या कलाकारांवर फॅन्स त्यांचा राग काढत त्यांना ट्रोल करायला सुरुवात करतात. सोशल मीडियाचे नाव घेतले की, ओघाने ट्रोलिंग देखील मागे येतेच. प्रत्येक कलाकाराला मग तो लहान असो किंवा मोठा त्याला ट्रोलिंगचा सामना करावाच लागतो. कधी कधी हे ट्रोलिंग कलाकारांना खूप त्रासदायक ठरते. काही कलाकार ट्रोलिंगकडे कानाडोळा देखील करतात. मात्र, आयुष्यात एकदा तरी या सर्वांबद्दल नक्की मनमोकळे बोलतात. सिनेसृष्टीतील अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता असलेल्या अरबाज खानने देखील त्याच्या घटस्फोटाच्या वेळेस आणि इतर वेळा ट्रोलिंगचा सामना केला आहे. मात्र, इतक्या वर्षात पहिल्यांदा एका मुलाखतीच्या वेळेस त्याने या सर्व गोष्टींवर मनमोकळेपणाने भाष्य केले आहे.

अरबाजने नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, “ट्रोलिंग म्हणजे फालतू प्रकार आहे. कोणाच्या सांगण्यावरून परिस्थिती बदलणार नाही. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात आधीच खूप चढ- उतार पाहिले आहेत. मी अशा अनेक परिस्थिती पाहिल्या आहेत, ज्यात मला जे काही जाणवायला पाहिजे होते, ते सर्व जाणवले. आपण सर्व लोकं कधीच परफेक्ट जीवन जगत नाही. आपण सर्वच चुका करतोच.”

आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटावर बोलताना अरबाज म्हणाला, “असे अनेक फॅन्स आणि फॉलोवर्स असतात, ज्यांना त्यांच्या आवडत्या कपलला एकत्र बघायला खूप आवडते. असेच आमिर खान आणि किरण राव यांच्यासोबत देखील घडते आहे. याचा अर्थ असा नाही की, आम्ही वाईट आहोत. ते असे दोन लोकं असतात ज्यांना एकमेकांच्या साथीने जीवन सुंदर बनवायचे असते. मात्र, कधीकधी अशी परिस्थिती येते की, ते वेगळे होतात. एकमेकांना आनंदी राहून पुढे जाऊ द्यावे लागते. यासाठी आम्हाला फरक पडत नाही.”

त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलताना तो म्हणाला, “माझ्या आयुष्यावर खासकरून माझ्या रिलेशनशिपवर कोणी कमेंट केली, तरीही मला काहीच फरक पडत नाही. मला माहित आहे हे सर्व बकवास असते, त्यामुळे मी याकडे दुर्लक्ष करून पुढे जातो.”

अरबाज खानचा लोकप्रिय चॅट शो असलेल्या ‘पिंच २’ चे दुसरे पर्व सुरू झाले आहे. या पर्वात पहिल्या भागात सलमान खानने हजेरी लावली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रिया वारियरचा देशात नाही तर परदेशात डंका! साडी नेसून रशियाच्या रस्त्यांवर केला भन्नाट डान्स

-‘सैंया झूठों का बड़ा सरताज निकला’ गाण्यावर थिरकली ऋचा चड्ढा; पब्लिक डिमांडवर शेअर केला व्हिडिओ

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Leave A Reply

Your email address will not be published.