×

लवकरच लग्नबंधनात अडकणार अभिनेता राहुल रामकृष्ण, शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा ‘लिप-लॉक’ फोटो

सिनेसृष्टीत एकामागून एक लग्नाचे बार उडतच आहेत. अशातच आता टॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आणि कॉमेडियन राहुल रामकृष्णने (Rahul Ramkrishna) त्याच्या लग्नाची घोषणा केली आहे. अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर त्याची मंगेतर हरितासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. मात्र, अभिनेत्याने अद्याप त्याच्या लग्नाची तारीख किंवा इतर काही माहिती सांगितली नाही. राहुलच्या लग्नाच्या घोषणेने त्याचे चाहते चांगलेच उत्साहित झाले आहेत.

शेअर केला रोमँटिक फोटो
राहुलने त्याच्या मंगेतरसोबतचा लिप-लॉकचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, “शेवटी लवकरच लग्न करणार आहे!” अभिनेत्याने त्याच्या मंगेतरला किस करतानाचा फोटो तर शेअर केला,  पण तिचे नाव सांगितले नव्हते. त्याचबरोबर सोशल मीडियावर राहुलच्या गर्लफ्रेंडचे नाव बिंदू असल्याचे सांगितले जात होते. मात्र त्यानंतर अभिनेत्याने पोस्टमध्ये सांगितले की, त्याच्या मंगेतरचे नाव बिंदू नाही तर हरिता आहे. (arjun reddy movie actor rahul ramakrishna announces his marriage)

पार्टीत झाली भेट
राहुलने सांगितले की, हरिता त्याच्या कामाची खूप मोठी चाहती आहे. दोघांची पहिली भेट एका पार्टीत झाली, त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. काही काळापूर्वीच राहुलने चित्रपटातील अभिनय सोडण्याबाबतचा धक्कादायक खुलासा केला होता. त्याने लिहिले होते की, “२०२२ नंतर मी चित्रपट करणार नाही.” मात्र, नंतर त्याने याला केवळ मस्करी असल्याचे सांगितले.

‘अर्जुन रेड्डी’मधून मिळाली ओळख
अभिनेता असण्यासोबतच राहुल एक लेखक आणि पत्रकार देखील आहे. त्याने २०१४ मध्ये ‘सैनमा’ या शॉर्ट फिल्ममधून तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याच्या करिअरला सुरुवात केली. मात्र त्याला खरी ओळख २०१७ मध्ये आलेल्या ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटातून मिळाली. तो नंतर ‘भारत अने नेनू’, ‘गीता गोविंदम’, ‘कल्की’, ‘प्रेशर कुकर’, ‘रिपब्लिक’ आणि ‘आरआरआर’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसला. अभिनेता लवकरच ‘वीरता पर्व’मध्येही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post