कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा बॉलीवूड कलाकार मधील लोकप्रिय जोडपं आहे. तरी या दोघांना 2025 मध्ये एक मुलगी झाली तिचे नाव सरैया सरायाह त्यांनी ठेवले. यारा आता तिच्या मातृत्वाच्या प्रवासात आहे. तर आता अभिनेता यश यांच्या चित्रपटात दिसणार आहे. ज्याचे नाव टॉक्सिक आहे. तर नुकतेच तिने तिच्या मातृत्वाबाबत आणि मुलीच्या संगोपणा बाबत तिला काय शिकवायचे आणि तिला नातेसंबंध व आधुनिक डेटिंगबद्दल काय शिकवायचे आहे, याबाबत तिने मोकळेपणे संवाद साधला.
कियारा अडवाणी (adwani)नुकतीच एका पॉडकास्टवर दिसली, जिथे तिने मातृत्व आणि तिची मुलगी सरायाहबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. मुलाखतीदरम्यान, कियाराने स्पष्ट केले की सरायाहच्या जन्मापर्यंत ती स्वतःला आणि सिद्धार्थला प्रियकर-प्रेयसी म्हणून पाहत होती. कियाराच्या मते, सरायाह स्वतः पालक झाल्यावरच त्यांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. कियारा म्हणाली, “कुठेतरी मला वाटत होते की ते तसेच असायला हवे. तो दृष्टिकोन काळ आणि अनुभवाने बदलला. तुम्ही तुमच्या बालपणी तयार केलेली सर्व नाती तुम्हाला काहीतरी शिकवतात आणि शेवटी तुम्हाला एक व्यक्ती म्हणून घडवतात.
कियारा म्हणते, “सरायाहने प्रेम, लग्न किंवा नातेसंबंधांबद्दल ठराविक कल्पना घेऊन मोठे व्हावे असे मला वाटत नाही. जर तिला डेट करायची असेल किंवा लग्न करायचे असेल नसेल यावर ती तिची मते घेण्यासाठी ती मोकळी आहे. आणि ती समाजाच्या किंवा कोणताही दबाव न राखता जीवन जगावे. आणि माझ्या मुलीने माझ्यासारखे ‘पीपल प्लीझर’ बनावं अशी माझी मुळीच इच्छा नाही. इतरांना सुखी करण्याच्या नादात तिने माझ्यासारखं स्वतःचं मत मारू नये. त्याऐवजी ती जिज्ञासू, प्रेमळ, आत्मविश्वासू असावी.
या गाण्याला 2 महिन्यांत मिळाले तगडे व्ह्यूज, यूट्यूबवर ‘धुरंधर 2’च्या गाण्यांनाही टाकलं मागे










