Saturday, April 20, 2024

आशुतोष राणा यांनी म्हटलेल्या शिवतांडव स्त्रोताचा व्हिडिओ फेसबुककडून डिलीट, कारण…

महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांनी आपल्या आवाजात शिव तांडव स्तोत्राचा हिंदी अनुवाद प्रकाशित केला होता.महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला रिलीझ झालेल्या या व्हिडिओला काही तासांत लाखो व्ह्यूज मिळाले होते. प्रसिद्ध कवी आणि गीतकार आलोक श्रीवास्तव यांनी रावणाच्या माध्यमातून या स्रोताचा हिंदी अनुवाद लिहिला आहे. हा अनुवादित व्हिडिओ आशुतोष राणा यांनी त्यांच्या फेसबुकवर शेअर केला होता, जो आता हटविण्यात आला आहे. असा सवाल उपस्थित करत त्यांनी फेसबुकला याबाबत दखल घेण्यास सांगितले आहे.

फेसबुकवरून डिलीट झाला आशुतोष राणा यांचा व्हिडिओ
आशुतोष राणा यांनी फेसबुकवर याबाबत स्वत: माहिती दिली आहे. ते म्हणाले, “मी थक्क झालो! काल महाशिवरात्रीला मी शेअर केलेली पोस्ट ज्यात तांडव स्तोत्राचा साधा अनुवाद व्हिडिओ होता, तो माझ्या टाइमलाइनमधून गायब आहे… स्वतःहून! असे का घडले असेल, मला कारण समजले नाही? कारण ना तो मी डिलीट केला आहे, ना तो व्हिडिओ कोणाच्या भावना दुखावणारा होता, ना तो फेसबुकच्या नियमांच्या विरुद्ध होता. #Facebook ने ही बाब विचारात घ्यावी.” (ashutosh rana sung shiv tandav stotra video disappeared from social media said)

याशिवाय त्यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत लिहिले होते की, “प्रिय आलोक श्रीवास्तव यांनी त्याच लयीत आणि तालात शिव तांडव स्तोत्राचा हिंदीत केलेला सोपा अनुवाद नक्कीच करोडो शिवनुरागींच्या आनंदाचे कारण बनेल. जगात प्रचलित असलेली विकृती नष्ट करून निसर्गाचे रक्षण व संवर्धन करावे, हर हर महादेव ही महादेवाला प्रार्थना आहे.”

यापूर्वीही केलंय एकत्र काम
अभिनेते आशुतोष राणा हे कवी आलोक श्रीवास्तव यांच्यासोबत केलेल्या सहकार्याबद्दल शेअर करताना म्हणाले, “या शिव तांडव स्तोत्रांचे लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत भाषांतर व्हावे, अशी माझी खूप दिवसांपासून इच्छा होती. म्हणून जेव्हा मला ही कल्पना सुचली, तेव्हा आलोकने माझे कौतुक केले आणि उत्साहाने ती हाती घेतली. मला सांगायला आनंद होत आहे की, भगवान शिवच्या आशीर्वादाने त्यांनी श्लोकांचे सुंदर भाषांतर केले आणि संपूर्ण गोष्ट अतिशय सहजतेने साकारली. आम्ही दोघेही भगवान शिवप्रती अतिशय आध्यात्मिक आहोत आणि आणखी कशासाठी तरी सहकार्य करत आहोत. हे आश्चर्यकारक वाटते. मी आलोकच्या कविता पाठ केल्या आहेत पण हे काहीतरी मोठे आहे आणि मी त्याची आतुरतेने वाट पाहत आहे.”

मात्र, आशुतोष राणांच्या या प्रश्नांवर फेसबुक काय दखल घेते याबाबत आताच काही सांगणे घाईचे ठरणार आहे. पण लोकांना अनेकदा अशा समस्यांना तोंड द्यावे लागते आणि तेही विनाकारण.

हेही वाचा – 

हे देखील वाचा