फसवणूक प्रकरणात अभिनेता डीनो मोरियासह ‘या’ ४ व्यक्तींची संपत्ती जप्त; काँग्रेस नेत्याच्या जावयाचाही समावेश


शुक्रवारी (२ जुलै) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे जावई, बॉलिवूड अभिनेता डीनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली आहे. गुजरातमधील औषध कंपनी असलेल्या स्टर्लिंग बायोटेक संदर्भातील फसवणूक प्रकरणात ही जप्ती झाली आहे. वित्तीय गुन्ह्यामध्ये कारवाई करणाऱ्या अंबलबजावणी संचालनालयाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

ईडीने सांगितले आहे की, धन शोध निरोधक अधिनियम (पीएमएलए) च्या अंतर्गत चार लोकांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. जप्त करण्यात येणारी एकूण संपत्ती ८.७९ कोटी रुपयांची आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय खान यांची ३ कोटी रुपयांची संपत्ती, डीनो मोरियाची १.४ कोटी रुपयांची संपत्ती, डीजे अकील यांची १.९८ कोटी रुपयांची संपत्ती आणि अहमद पटेल यांचे जावई असलेल्या इरफान अहमद सिद्दीकी यांची २.४१ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

शिवाय ईडीने सांगितले की, स्टर्लिंग बायोटेक समूहाचा पळकुटा प्रवर्तक असलेल्या नितीन संदेसरा आणि चेतन संदेसरा यांनी चुकीच्या मार्गाने कमावलेले पैसे या चारही लोकांना दिले होते. ईडीने पुढे सांगितले की, नितीन संदेसरा, चेतन संदेसरा या बंधूंसोबत चेतनची पत्नी दिप्ती संदेसरा आणि हितेश पटेल यांना एका विशेष कोर्टाने पळकुटा आर्थिक आरोपी म्हणून घोषित केले आहे.

धन शोधीचे हे प्रकरण १४,५०० कोटी रुपयांच्या बँकच्या धोखाधडीसोबत जोडले गेलेले असून, हा सर्व प्लॅन स्टर्लिंग बायोटेक आणि कंपनीच्या मुख्य प्रवर्तकांनी रचला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.