Wednesday, July 2, 2025
Home कॅलेंडर जेवणात विष कालवून ‘या’ व्यक्तीने केला जीव घेण्याचा प्रयत्न, तीन महिने अंथरुणाला खिळल्या होत्या लता दीदी

जेवणात विष कालवून ‘या’ व्यक्तीने केला जीव घेण्याचा प्रयत्न, तीन महिने अंथरुणाला खिळल्या होत्या लता दीदी

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी या सिनेसृष्टीतील अनेक चित्रपटांमध्ये आपल्या संगीताने त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. त्यांच्या लयबद्ध आवाजाने अनेकांना भुरळ घातली आहे. त्यांची गाणी ऐकून कधी मन प्रसन्न होते, तर कधी हृदय जड होऊन अश्रू दाटून येतात.

लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये २८ सप्टेंबर १९२९ मध्ये झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया असे ठेवण्यात आले होते. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. त्यांच्याकडून लता दीदींनी संगीताचे धडे गिरवले. (Attempt was made to kill Lata Mangeshkar by giving poison, it took three months to recover)

वडिलांना माहीत नव्हती त्यांच्या आवाजाची जादू
पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. ते घरी काही मुलांना संगीताची शिकवण देखील देत होते. अशात एकदा त्यांचा एक शिष्य गाणं शिकत होता. पण त्याचा सूर नीट लागत नव्हता. त्यामुळे दीनानाथ यांनी त्याला रियाज करायला सांगितला आणि ते तिथून थोडावेळ बाजूला झाले. त्यावेळी छोट्या लता मंगेशकर हे पाहत होत्या. त्या रियाज करत असलेल्या मुलाजवळ गेल्या आणि त्याला म्हणाल्या, “तू चुकीचं गात आहे, हे सूर असे गायचे.” असे म्हणत त्याला सूर लाऊन दाखवले. त्यावेळी त्यांचे वडील त्यांना मागून पाहत होते. त्यांच्या लक्षात आले की, माझ्याच घरात एक उत्तम गायिका आहे आणि मी बाहेरच्या मुलांना संगीत शिकवत बसलो.

वडिलांनी केली होती ‘ही’ भविष्यवाणी
लता दीदी त्यांच्या भावंडांमध्ये सर्वात मोठ्या होत्या. दीनानाथ यांनी त्यांच्या आवाजाची जादू पहिली होती. त्यावेळी त्यांनी लता दीदींना सांगितले होते की, “बाळा एक दिवस तू खूप मोठी गायिका होशील, खूप नाव कमावशिल. पण तुझे यश मला बघता येणार नाही. तुझे कधी लग्नही होणार नाही. कारण तुझ्यावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी असणार आहे.” त्यावेळी छोट्या लता दीदींना याची कल्पना नव्हती की, त्यांचे वडील लवकरच या जगाचा निरोप घेणार आहेत. लता दीदी लहान असतानाच त्यांचे वडील वारले आणि त्यांच्यावर आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या लहान भावंडांची जबाबदारी पडली.

पहिला अभिनय आणि पहिल्या संगीताला केली ‘अशी’ सुरुवात
लता दीदींचे वडील नाट्यकलावंत देखील होते. एकदा त्यांच्या एका नाटकामध्ये घोळ झाला होता. गाणे गाऊन नारायणाचा अभिनय करणारा कलाकार तेथे उपस्थित नव्हता. नाटकाचा खेळ सुरू व्हायला आला होता, पण त्या कलाकाराला यायला आणखी उशीर होणार होता. त्यावेळी लता दीदी त्यांच्या वडिलांना म्हणाल्या की, “बाबा मी साकारू का नारायणाची भुमिका.” त्यावेळी त्यांचे वडील म्हणाले “तू लहान आहेस बाळा.” दीनानाथ यांना असे वाटत होते, की लता दीदी गाऊ शकणार नाहीत. परंतु एकतरी संधी द्या, असे म्हणत लता दीदींनी हे काम मिळवले आणि त्यांच्या अभिनयाला व गाण्याला वन्स मोअर देखील मिळाला. त्यावेळी गायिका फक्त पाच वर्षांच्या होत्या.

वयाच्या मोठ्या वळणावर घडला होता भयंकर प्रसंग
लता दीदींनी चित्रपटांमध्ये त्यांच्या गाण्याची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. यशाचे शिखर गाठत असताना बॉलिवूडच्या गानकोकिळा लता दीदींचा जीव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यांच्या जेवणात विष मिसळण्यात आले होते. याचा त्यांना खूप त्रास झाला आणि तब्बल तीन महिने त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. त्यांच्या घरातील आचाऱ्याने जेवणात विष मिसळवले होते. लता दीदींना जेव्हापासून त्रास होऊ लागला, तेव्हापासून तो आचारी त्याचा पगार न घेता फरार झाला होता. लता दीदींकडे कोणताही ठोस पुरावा नसल्याने, त्यांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली नाही.

हेही वाचा :

हे देखील वाचा