Thursday, March 28, 2024

प्रभास ते यश, ‘या’ दाक्षिणात्य कलाकारांची खरी नावे माहित आहेत का? जाणून घ्याल तर चकित व्हाल

सध्या सिनेसृष्टीत सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपटांचा आणि कलाकारांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांना मिळणाऱ्या जोरदार यशाची सर्वत्रच चर्चा सुरू आहे. त्यामुळेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांचीही लोकप्रियता प्रचंड वाढताना दिसत आहे. या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते. प्रभास, यश असे अनेक दाक्षिणात्य कलाकार आहेत ज्यांनी देशभरात प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. परंतु अनेकांना या कलाकारांची खरी नावे माहित नाहीत. चला तर जाणून घेऊया लोकप्रिय दाक्षिणात्य कलाकारांची खरी नावे. 

प्रभास (Prabhas) – बाहुबली चित्रपटातून संपूर्ण भारताचा स्टार बनलेल्या अभिनेता प्रभासचे पूर्ण नाव मोठे आहे. देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता प्रभासचे पूर्ण नाव ‘उप्पलपती वेंकट सत्यनारायण प्रभास राजू’ आहे.

यश (yash)- आज प्रत्येकजण KGF स्टार यशला त्याच्या नावाने किंवा रॉकी भाईने ओळखतो, पण तुम्हाला त्याचे पूर्ण नाव माहित आहे का? अभिनेता यशचे पूर्ण नाव यश गोडा असून त्याचे खरे नाव नवीन कुमार गौडा असल्याचे सांगितले जाते.

ज्युनियर एनटीआर (Junior NTR) – आरआरआर चित्रपटामुळे अभिनेता ज्युनियर एनटीआरची लोकप्रियता वाढली आहे. ज्युनियर एनटीआरचे पूर्ण नाव ‘नंदामुरी तारका रामाराव’ हे फार कमी लोकांना माहीत असेल.

राम चरण (Ram Charan)- अभिनेता राम चरणचे नाव देखील दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे आणि आज ते देशभर प्रसिद्ध झाले आहेत. मात्र इतर स्टार्सप्रमाणेच राम चरणचे पूर्ण नाव ‘कोनिडेला रामचरण तेजा’ आहे.

चिरंजीवी- अभिनेते चिरंजीवी यांना दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. ते नेहमीच त्यांच्या चिरंजीवी नावाने ओळखले जातात, मात्र त्यांचे छोटे नाव आहे. चिरंजीवी हे अभिनेता राम चरण यांचे वडील असून त्यांचे पूर्ण आणि खरे नाव ‘कोनिडेला शिव शंकर वारा प्रसाद’ आहे.

हेही वाचा – प्रदर्शनाआधीच ‘थँक गॉड’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, अजय देवगणसह सिद्धार्थ मल्होत्रावर गुन्हा दाखल
अनुष्कापासून ते बिपाशापर्यंत, ‘या’ अभिनेत्रींनी साकारल्यात हॉरर भूमिका, पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
पनवेलच्या फार्महाऊसची रेकी करून बिश्नोई गँगने केलेला बंदोबस्त; सलमानच्या हत्येसाठी काय होता ‘प्लॅन बी’

हे देखील वाचा