पुण्यात शिकत असलेल्या मुनमुनची अशी झाली होती ‘तारक मेहता का उलटा चष्मा’मधील बबिताच्या रोलसाठी निवड


मागील १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करणाऱ्या ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक गाठले. ३५०० भाग झालेली ही मालिका आजही टीआरपीमध्ये टॉप ५ मध्ये असते. या मालिकेतील सर्वच कलाकार आता रसिकांना त्यांच्या घरातलेच वाटू लागले आहेत. सर्व कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे.

याच मालिकेत अतिशय सुंदर, महत्वाचे पात्र साकारणारी बंगाली ब्युटी बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता. मुनमुनने या मालिकेतून तिचा प्रचंड मोठा फॅन क्लब तयार केला आहे. मालिकेत जेठालालला आपल्या सौंदर्याने वेड लावणारी मुनमुन खऱ्या आयुष्यातही सर्वाना तिच्या फिटनेसने आणि लूक्सने घायाळ करते. मुनमुन काहीच दिवसांपूर्वी प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टँड अप कॉमेडियन आणि यूटुबर असणाऱ्या जाकीर खान याच्या हॅलो इंडिया २०२१ नावाच्या शो मध्ये पोहचली होती.

मुनमुनची लोकप्रियता फक्त तरुणांमध्येच आहे असे नाही, तर ती लहान मुलं, वयोवृद्ध माणसं यादीमध्ये सुद्धा लोकप्रिय आहे. या शोमध्ये तिने ती सर्वच वयोगटात का प्रसिद्ध आहे याचे उत्तरही दिले. यासोबतच मनमुराद गप्पा मारत तिची अनेक गुपिते सुद्धा सांगितली.

ती म्हणाली, ” वयस्कर लोकांना वाटते की, काश माझी देखील अशी एखादी गर्लफ्रेंड असती, आणि टीनएजर्स मुलांना वाटते की, मोठे झाल्यावर आम्हाला अशीच गर्लफ्रेंड पाहिजे. ”

मुनमुनने पुण्यात शिकत असताना, मॉडेलिंग करायला सुरुवात केली. त्यानंतर मी मुंबईला आली आणि तिने अभिनयात नशीब अजमावण्याचे ठरवले. तिने ‘हम सब बाराती’ मालिकेसाठी ऑडिशन दिले आणि तिची निवड देखील झाली. तिने मुंबई एक्सप्रेस नावाचा सिनेमादेखील केला आहे.

२००८ साली मुनमुनने तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत काम करायला सुरुवात केली. या मालिकेनेच तिला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. खूप कमी लोकांना माहित असेल, की मुनमुन एक ट्रॅव्हलर आहे. तिला फिरण्याची प्रचंड हौस आहे. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले होते की, तिच्या घरात तिची एक बॅग भरून तयार असते.


Leave A Reply

Your email address will not be published.