डीसी कॉमिक्स यांची फ्रँचायजी ‘जस्टिस लीग’चा पुढचा भाग ‘जस्टिस लीग: स्नायडर कट’ हा त्याच्या चाहत्यांच्या समोर येण्यास तयार झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ‘झॅक स्नायडर’ यांनी चित्रपटाची तारीख सांगितली आहे. हा चित्रपट याच वर्षी 18 मार्चला ओटीटी प्लॅटफॉर्म एचबीओ मॅक्सवर प्रदर्शित होणार आहे. आताच या चित्रपटाचा एक खास लूक प्रेक्षकांसमोर आला आहे. या पोस्टरमध्ये बॅटमॅनचा नवा लूक दाखवला आहे.
जस्टिस लीगच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा संपूर्ण चाहतावर्ग बघत होता. पण मिळालेल्या माहितीनुसार जस्टिस लीगचा पुढचा पार्ट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. याचा ट्रेलरदेखील रिलीझ झाला आहे. समोर आलेल्या त्याच्या काही फोटोंनुसार कुठे तरी अंधार असलेल्या जागेत सुपरहीरो उभा आहे. महत्वाचं म्हणजे हा फोटो मागून काढला आहे. जेणेकरून त्यांच्या चाहत्यांच्या मनात या चित्रपटाला घेऊन उत्सुकता वाढली आहे.
Zack Snyder has teased his cut of Justice League once again, offering fans a glimpse of Affleck suited up as the Knightmare version of Batman. https://t.co/lLV4TBQkwk pic.twitter.com/c6eXshT7v2
— IGN (@IGN) February 4, 2021
Reborn #SnyderCut Streaming 3.18.21 #UsUnited pic.twitter.com/q5pVjCwYur
— Zack Snyder (@ZackSnyder) January 29, 2021
बॅटमॅन हा सुपरमॅनचा एक हिस्सा होता, ज्यामध्ये ब्रूस वेनने डार्कसिडचं स्वप्न पाहिलं होतं. अपोकोलिप्सची सेना पृथ्वीवर कब्जा करते. जर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं, तर हा मार्व्हलच्या ‘ऍवेंजर्स’ चित्रपटासारखा आहे. ज्यामध्ये डीसी कॉमिकचे सगळे सुपरहिरो एकत्र पाहायला मिळतात.
या चित्रपटात बॅटमॅन, सुपरमॅन, अंडर वूमन, ऍक्वामॅन, फ्लॅश आणि सिबर्ग हे सगळे सुपरहिरो सोबत येणार आहे. याआधी 2017 मध्ये दिग्दर्शक जॉस वेडनने आपला चित्रपट जस्टिस लीगमध्ये डीसी कॉमिकच्या सर्व सुपरहिरोंना सोबत आणण्याचं काम केलं आहे.
हा चित्रपट 4 तासांचा असणार आहे. या चित्रपटात तो प्रत्येक सीन सामील असणार आहे, ज्याला स्टुडिओ द्वारे 2 तासांपेक्षा कमी ठेवण्याचा निर्णय घेऊन ते चित्रपटातून काढले होते. यामध्ये व्हिक्टर स्टोन किंवा सायबोर्गची बॅकस्टोरी बॅरी ऍलन यांचे सर्व सीन दाखवले जाणार आहेत.
हेही वाचा-