Latest Posts

भाग्यश्री मोटेने सुंदर फोटो केले शेअर; तर केसात माळलेल्या फुलानेच वेधलं सोशल मीडियाचं लक्ष


मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री म्हटलं की, भाग्यश्री मोटेचे नाव लक्षात येते. ती सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय व्यक्तीमत्त्व आहे. ती सोशल मीडिया सक्रिय राहणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोने ती सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. याशिवाय तिचे फोटो चाहत्यांना पुरते वेडे करून सोडतात. ती आपल्या हॉट अदांनी चाहत्यांना अक्षरशः घायाळ करते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

नुकतेच भाग्यश्रीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत, जे बघता बघताच व्हायरल झाले. या फोटोंमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर दिसत आहे. यात तिचे निरागसतेचे भाव झळकत आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की,तिने सोनेरी काठ असलेला काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. खासकरून भाग्यश्रीने केसात माळलेलं गुलाब नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

https://www.instagram.com/p/CRnfc57rftS/?utm_source=ig_web_copy_link

हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय ‘अबोल’. तिच्या फोटोसोबतच हे लक्षवेधी कॅप्शनही चर्चेत आलं आहे. या फोटोवर कमेंट करून चाहते तिचे तोंडभरून कौतुक करत आहे. न बोलताही खूप काही बोलून गेलीस, असं चाहते कमेंट्सच्या माध्यमातून तिला म्हणत आहेत. तसेच अल्पावधीतच या फोटोवर ३० हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत. (bhagyashree mote shared her beautiful pictures on internet)

भाग्यश्रीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘देवो के देव’, ‘सिया के राम’, ‘जोधा अकबर’ या हिंदी मालिकांमध्ये झळकली आहे. तर ‘देवयानी’, ‘प्रेम हे’, ‘देवा श्री गणेशा’ या मराठी मालिकेमध्ये देखील तिने काम केले आहे. याशिवाय ‘काय रे रास्कला’ आणि ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. अभिनेत्रीने ‘चिकाटी गडीलो चिथाकोतूडू’ या तेलगू चित्रपटातही काम केले आहे. आता भाग्यश्रीचे चाहते तिला हिंदी चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक असतील, यात शंकाच नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मला माहितीये लोक माझ्या वडिलांचा तिरस्कार करतात…’; #meetoo बाबत आलिया कश्यपने केले तिचे मत व्यक्त

-राज कुंद्राच्या सांगण्यावरून अनेक प्रोडक्शन हाऊस बनवत होते पॉर्न व्हिडिओ; ७० पेक्षाही अधिक लोक लागले पोलिसांच्या हाती

-जान्हवी कपूरने स्टेजवर चुलती महीप कपूरसोबत लावले ठुमके; ‘नदियों पार’ गाण्यावरचा परफॉर्मेंस तूफान व्हायरल


Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss