हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक सुपरहिट चित्रपट होऊन गेले ज्यांनी दमदार कलाकार आणि कथेच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आजही ते सिनेमे प्रेक्षकांच्या मनात आठवणी बनून राहिले आहेत. सलमान खान आणि भाग्यश्री यांची जोडी असलेला ‘मैंने प्यार किया‘ चित्रपट याच विभागातला एक लोकप्रिय चित्रपट आहे. दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा हा सुपरहिट चित्रपट 1989 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्यामध्ये सलमान खान आणि भाग्यश्रीची सुंदर लव स्टोरी दाखविण्यात आली होती. या चित्रपटानंतरच सलमान आणि भाग्यश्री चित्रपट जगतात लोकप्रिय कलाकार म्हणून उदयास आले होते. याच चित्रपटामुळे ते रातोरात सुपरस्टार झाले होते. आज म्हणजेच गुरुवारी (दि. 23 फेब्रुवारी) रोजी अभिनेत्रीचा 54 वा वाढदिवस आहे. चला तर मग अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया भाग्यश्रीच्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा…
चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत असलेल्या भाग्यश्रीचा (bhaghyashree) हा पहिलाच चित्रपट होता. या सिनेमानंतर ती यशस्वी तर खूप झाली मात्र सिनेमांपासून दूर देखील गेली. ती आता पुन्हा पडद्यावर दिसू लागली असली तरी अनेक कार्यक्रमात बोलताना ती तिच्या पहिल्या चित्रपटाविषयी बऱ्याच आठवणी सांगितल्या आहेत, किंबहुना आजही सांगते. असच एक किस्सा तिने एका मुलाखतीमध्ये सांगितला होता. या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी तिने सलमान खानला तिच्यापासून दूर रहा असे बजावले होते. असा धक्कादायक खुलासा तिने मुलाखतीमध्ये सांगितले होते.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, भाग्यश्रीने एका मोठ्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ‘मैंने प्यार किया’ चित्रपटातील अनेक आठवणी सांगितल्या होत्या. यावेळी बोलताना भाग्यश्री म्हणाली होती की, “मी सलमान खानला माझ्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता कारण मला माझ्या आणि सलमान खानबद्दलच्या कोणत्याही खोट्या अफवा पसरलेल्या नको होत्या.’
याबद्दल पुढे बोलताना भाग्यश्री म्हणाली की, “मी त्यावेळी हिमालयला डेट करत होते. आणि चित्रपटातील ‘दिल दिवाना’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान सलमान खानला याबद्दल समजले होते. तो सतत माझ्या मागे मागे यायचा आणि माझ्या कानात गाणं गुणगुणायचा. तेव्हा मी त्याला लोकं आपल्याबद्दल उलट सुलट बोलायला सुरू करतील असे सांगितले. तो मला दिवस दिवस त्रास देत असायचा. यानंतर त्याने मला हिमालय आणि तुझ्याबद्दल सर्व समजल्याचेही सांगितले होते. इतकेच नव्हे तर सलमान खाननेच मला हिमालयला शूटिंगच्या ठिकाणी बोलावण्याची आयडिया दिली होते, आणि त्यांची छान भेट सुद्धा झाली होती.” असे भाग्यश्री पुढे बोलताना म्हणाली.
भाग्यश्रीला तिच्या पहिल्याच चित्रपटातून अमाप लोकप्रियता मिळाली. परंतु त्यानंतर तिने चित्रपटात काम न करता हिमालय दासानीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीमध्ये जेव्हा भाग्यश्रीला चित्रपट क्षेत्राला सोडून देण्याचा निर्णय त्रासदायक होता का? असा प्रश्न विचारला तेव्हा ती म्हणाली, “हो पण आणि नाही पण असे उत्तर दिले होते. परंतु हा कठीण काळ होता कारण तेव्हाच मला जाणीव झाली की मला अभिनय करण्यात मजा येतेय.” अशी खंत तिने व्यक्त केली होती.
याबद्दल पुढे बोलताना भाग्यश्री म्हणाली की, “माझ्यासाठी तो काळ असा होता जेव्हा मला वाटायचे की, मला दोन्ही गोष्टीचे व्यवस्थित नियोजन करण्याचा काही तरी मार्ग असावा. परंतु ते शक्य नव्हतं कारण अभिमन्यू (तिचा मुलगा) नुकताच जन्माला आला होता. मला तिकडे पूर्णवेळ लक्ष देणे गरजेचे होते. तो कठीण काळ नव्हता मला फक्त त्याच्यासोबत वेळ घालवायचा होता.” असे ही ती पुढे म्हणाली.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ कारणामुळे भाग्यश्रीचा पती होता नाराज, अभिनेत्रीने लग्नानंतरच्या दिवसांचा केला खुलासा
लग्नाच्या अनेक वर्षांनी भाग्यश्रीने केला खुलासा, ‘या’ कारणामुळे पतीने दिला होता चित्रपटात काम करण्यास नकार