दुःखद.! ‘चलो बुलावा आया है’ फेम भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे निधन, कलाविश्व हळहळले

दुःखद.! 'चलो बुलावा आया है' फेम भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे निधन, कलाविश्व हळहळले


प्रसिद्ध भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भजन गायक चंचल हे मागील 3 महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

नरेंद्र चंचल यांनी अनेक स्तोत्रांसह हिंदी चित्रपटातही गाणी गायली आहेत. ते विशेषतः भजन गीतासाठी ते परिचित होते. भक्तीसंगीतात त्यांनी त्यांची वेगळी छाप निर्माण केली होती. अखेर आज प्रदिर्ध आजाराने वयाच्या ८० व्या वर्षी त्यांचे नवी दिल्लीत निधन झाले.

सोशल मीडिया पोस्टद्वारे नरेंद्र चंचल यांचे निधन झाल्याची माहिती गायक दलेर मेहेंदी यांनी दिली आहे. कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नरेंद्र चंचल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

अमृतसरच्या नमक हांडी येथे 16 ऑक्टोबर 1940 साली जन्मलेल्या नरेंद्र चंचल यांना अनेक संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये काम मिळाले होते. बॉबी, बेनाम, रोटी कपडा और मकान या चित्रपटांसाठीही त्यांनी गाणी गायली. त्यांनी गायलेले ‘बॉबी’ चित्रपटातील ‘बेशक मंदिर मस्जिद तोडो’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. पण त्यांना खरी ओळख दिली ती ‘चलो बुलावा आया है’ या ‘अवतार’ या चित्रपटातील गाण्याने.

नरेंद्र चंचल यांना यासाठी फिल्मफेअर बेस्ट मेल प्लेबॅक पुरस्कार सुद्धा मिळाला होता.


Leave A Reply

Your email address will not be published.