अभिनेता गोविंदाच्या वाढदिवशी जाणून घ्या त्याच्या एकूण संपत्तीचा आकडा, महिन्याची कमाई ऐकून होतील डोळे पांढरे


बॉलिवूड कॉमेडीचा बादशाह गोविंदा याने नेहमीच आपल्या कॉमेडी आणि जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यामुळेच आजपर्यंत अनेक तरुण त्याला फॉलो करतात. एक काळ असा होता की, गोविंदाकडे चित्रपटांची लाईन असायची. गोविंदा अतिशय व्यस्त अभिनेत्यांपैकी एक होता. गोविंदा त्याच्या चित्रपटातून भरपूर कमाई देखील करायचा. अनेक ब्रँड एंडोर्समेंटसाठी अभिनेत्यांनाही बोलावले जाते. गोविंदा आज मंगळवारी (२१ डिसेंबर ) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग गोविंदाच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.

गोविंदाची एकूण संपत्ती

गोविंदाची (Govinda) एकूण संपत्ती १३३ कोटी रुपयांची असून, त्याचे मासिक उत्पन्न तब्बल १ कोटींहून अधिक आहे. ज्यानुसार वर्षभराचे त्याचे उत्पन्न १०-१२ कोटी एवढे आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, गोविंदा एका चित्रपटासाठी ५ ते ६ कोटी रुपये घेतो. दुसरीकडे, गोविंदा ब्रँड एंडोर्समेंटसाठी २ कोटी रुपये घेतो. याशिवाय चित्रपटाच्या नफ्यातही तो आपला वाटा उचलतो.

गोविंदाचे घर

गोविंदाचे मुंबईत आलिशान घर आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, त्याच्या मालमत्तेची किंमत १६ कोटी आहे. गोविंदाच्या मुंबईत आणखी २ मालमत्ता आहेत. एक बंगला जुहूमध्ये आणि एक मड आयलंडमध्ये आहे. याशिवाय गोविंदाकडे बरीच मालमत्ता देखील आहे.

गाड्या

गोविंदाकडे लक्झरी वाहनांमध्ये मित्सुबिशी लान्सर, फोर्ड एंडेव्हरसह इतर अनेक वाहने आहेत.

व्यावसायिक जीवन

गोविंदाने १९८६ मध्‍ये ‘लव्ह ८६’ या चित्रपटातून अभिनय करिअरला सुरुवात केली होती. त्याचवर्षी गोविंदाने आणखी चार चित्रपट केले. गोविंदाने दरवर्षी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. गोविंदाने आपल्या करिअरमध्ये फॅमिली, ड्रामा, ऍक्शन, रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

‘आंखे’, ‘राजा बाबू’, ‘कुली नंबर १’, ‘हिरो नंबर १’, ‘हसीना मान जायेगी’, ‘साजन चले ससुराल’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘जिस देश में गंगा रहती है’, ‘क्योंकि मैं झूठ नहीं बोलता’, ‘अखियों से गोली मारे’, या त्यांच्या हिट आणि लोकप्रिय चित्रपटांचा समावेश आहे. ‘भागम भाग’ आणि ‘पार्टनर’ समाविष्ट आहे.

गोविंदा अखेरचा ‘रंगीला राजा’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात गोविंदाची दुहेरी भूमिका होती. हा चित्रपट जरी फ्लॉप ठरला. आता गोविंदा ‘चष्मा चढाके’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात गोविंदासोबत शनाया कौर मुख्य भूमिकेत आहे. गोविंदाच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे गाणे प्रदर्शित झाले होते जे रसिकांच्या पसंतीस उतरले होते.

हेही वाचा :

अशाप्रकारे शूट झाला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील रोमॅंटिक सीन शूट, प्रार्थनाने केला व्हिडिओ शेअर

नवीन घराच्या बाल्कनीमध्ये रोमॅंटिक झाले कॅटरिना आणि विकी, शेअर केला क्युट फोटो

लग्नानंतर अंकिता लोखंडेने शेअर केला गृह्प्रवेशाचा व्हिडिओ, पत्नीची साडी सांभाळताना दिसला विकी 


Latest Post

error: Content is protected !!