‘एक्स्प्रेस क्वीन’ जुही चावलानेही फॉलो केला ‘पावरी’ ट्रेंड, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

Actress Juhi Chawla and Akshay Kumar's pawari video viral on social media


सध्या सोशल मीडियावर ‘पावरी हो रही है’ हा ट्रेंड खूपच व्हायरल होताना दिसत आहे. यावर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दिसत आहेत. यात अनेक टीव्ही कलाकारांपासून ते अनेक बॉलिवूड कलाकारांपर्यंत ‘पावरी हो रही है’ हा ट्रेंड फॉलो केला जात आहे. त्यांच्या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती देखील मिळत आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ केल्यावर बॉलिवूडमधील ही अभिनेत्री तरी का मागे राहील बर! बॉलिवूडमधील एक्स्प्रेस क्वीन जुही चावलाही या ट्रेंडमध्ये सामील झाली आहे.

तिने तयार केलेल्या व्हिडिओमध्ये ती बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार सोबत दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ प्रेक्षकांसोबत सोबत शेअर करत तिने एक मजेशीर कॅप्शन लिहले आहे. ती म्हणते की, “जर अक्षय कुमार बॉलिवूडचा खिलाडी असेल, तर ‘मिस्टर आणि मिसेस खिलाडी’ या चित्रपटनुसार मी बॉलिवूडची मिसेस खिलाडी आहे.”

त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘सुर्यवंशी’ या आमागी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट यावर्षी 30 एप्रिलला रिलीझ होणार आहे. चित्रपटाची तारीख प्रदर्शित करते वेळी चित्रपटाचे निर्माते असे म्हणाले की, “सुर्यवंशी हा एक अनुभव आहे, ज्याला आम्ही तुमच्यासाठी बनवले आहे. एक वर्षाच्या कडक मेहनतीनंतर आम्ही या चित्रपटाचा टिझर रिलीझ केला आहे. जो प्रतिसाद आम्हाला मिळत आहे तो अविश्वसनीय आहे. हा चित्रपटाला पाहायला तुम्ही जेवढे उत्साहित आहात, तेवढेच उत्साहित आम्ही देखील आहोत.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गायिका रेणुकाचे ‘५२ गज का दामन’ गाण्याच्या यशानंतर नवीन गाणे रिलीझ, अवघ्या ५ दिवसात १३ लाख हिट्स

-मोनालिसाही झाली ‘डोन्ट रश चॅलेंज’मध्ये सामील, डान्स मुव्हने लावले चाहत्यांना वेड

-आलिया भट्टचा ‘हा’ डायलॉग म्हणत चक्क रडली होती सारा अली खान, पाहा थ्रोबॅक व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.