आमिर खानच्या सिनेमातील ‘या’ गाण्यावर भोजपुरी अभिनेत्री अक्षर सिंगने दिले जबरदस्त एक्सप्रेशन

अभिनेत्री अक्षरा सिंग ही भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. भोजपुरी चित्रपटात काम करून तिने तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. चित्रपटाव्यतिरिक्त अक्षरा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे मजेशीर व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिचे चाहते तिला अनेक प्रश्न विचारत आहेत. तसेच या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

अक्षराने सोशल मीडियावर जो व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये ती आमिर खानच्या सिनेमातील गाणे ‘चार कदम’वर जबरदस्त एक्सप्रेशन दिले आहे. तिचे चाहते या व्हिडिओवर खूप प्रेम दर्शवत आहेत. या व्हिडिओमध्ये अक्षरा गुलाबी रंगाच्या टॉपमध्ये खूप सुंदर दिसत आहे. अक्षराने हातावर मेहेंदी लावली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही व्हिडिओवर कमेंट करण्यापासून स्वतःला थांबवू शकणार नाही. (Bhojpuri actress akshara singh share her video on social media)

View this post on Instagram

A post shared by Akshara Singh (@singhakshara)

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “माझ्या प्रिय आणि चांगल्या चाहत्यांचे मी मनापासून आभार मानते. मी तुम्हा सगळ्यांसोबत आयुष्यभर चालायला तयार आहे. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून एक मिठी.” यासोबत तिने हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे.

तिचा हा व्हिडिओ पाहून चाहते सातत्याने कमेंट करून तिचे कौतुक करत आहे. या व्हिडिओला १५ हजारापेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तिच्या एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “तुला खूप प्रेम,” तर आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “खूप सुंदर मॅडम.”

अक्षरा सिंगने भोजपुरी गायक रितेश पांडेच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील केली होती. अक्षराने सांगितले की, तो तिला मार हान करत होता तसेच त्याने तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. या नंतर ती खूपच चर्चेत आली होती. परंतु तिला या गोष्टीचा काहीच फरक पडला नव्हता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

साध्याभोळ्या अंतराने वेस्टर्न ड्रेस परिधान करत लावले जोरदार ठुमके, चाहता म्हणाला, ‘विषय संपला’

अरे भारीच की! ‘बाहुबली’ चित्रपट येणार मराठी भाषेत, ‘हे’ दोन कलाकार देणार चित्रपटाला आवाज

यहुदी संस्कृतीची माहिती देणारा, भयपटांच्या अजून एक पाऊल पुढे जाणारा ‘डिबुक’ लवकरच होणार प्रदर्शित

Latest Post