भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाच्या नवीन फोटोचा सोशल मीडियावर जलवा, चाहत्यांनी दिल्या खास प्रतिक्रिया

Bhojpuri Actress Monalisa Latest Pics In Light Blue Gown Viral She Looks Like Pirncess


बॉलिवूड, हॉलिवूड आणि मराठी या चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींचा सोशल मीडियावरील दबदबा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. यामध्ये भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीही मागे नाहीयेत. भोजपुरीतील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिचे फोटो काही क्षणातच व्हायरल होत असतात. नुकतेच तिने आपले फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांना भलतेच आवडले आहेत.

मोनालिसाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोत अभिनेत्रीने निळ्या रंगाचा शोल्डर गाऊन घातला आहे. हा एक रेड कार्पेट लूक आहे. यामध्ये तिचे रूप खुलून आलं आहे. पूर्ण ड्रेसमध्ये एब्रॉयडरी आहे, ज्यामुळे तिच्या सुंदरतेमध्ये आणखी भर पडली आहे. लूक परिपूर्ण करण्यासाठी मोनालिसाने आऊटफिटसोबतच मिनिमल ज्वेलरीचा समावेश केला आहे.

मोनालिसाने लूक सिंपल बनवण्यासाठी सुंदर हेअरस्टाईलही बनवली आहे. तिने आपल्या केसांना एका बाजूने कुरुळे केले आहेत. एकूणच तिने आकर्षक दिसण्यासाठी सर्व गोष्टी व्यवस्थितरीत्या हाताळल्या आहेत.

मोनालिसाचा हा लूक पाहून चाहते खूपच खुश आहेत. एका चाहत्याने कमेंट करत म्हटले की, “राणी दिसत आहेस.” दुसरीकडे काही चाहत्यांनी तिने निवडलेल्या ड्रेस स्टाईलचीही प्रशंसा केली आहे. सोशल मीडियावर मोनालिसाचे या गाऊनमधील फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

यापूर्वीही मोनालिसाने तिचे खास फोटो शेअर केले होते.

मोनालिसाने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यामध्ये ‘देश परदेस’, ‘भोले शंकर’, ‘देवरा बडा सतावेला’, ‘देवरा भाईल दीवाना’, ‘हिटलर’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.