भोजपुरी अभिनेत्रीने केला दीपिकाच्या ‘दम मारो दम’ गाण्यावरील व्हिडिओ शेअर, एक्सप्रेशन्स पाहून चाहत्यांनी केले कौतुक

Bhojpuri actress Rani chatterjee dance on Bollywood song


भोजपुरी चित्रपटसृष्टीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि डान्सने प्रेक्षकांना दिवाने बनवण्याची एकही संधी सोडली नाही. यातच गणना होते ती म्हणजे अभिनेत्री राणी चटर्जी हिची. राणी ही तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील सातत्याने सक्रिय असते. तिच्या फोटो आणि व्हिडिओने ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. सोशल मीडियावर तिचे लाखोंमध्ये फॅन फॉलोविंग आहे. ती तिचे वेगवेगळे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तसेच तिच्या डान्सचे व्हिडिओ देखील पोस्ट करत असते. अशातच राणीने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या ‘दम मारो दम’ या गाण्यावर डान्स करत आहे. या गाण्यातील तिचे हावभाव बघून तिचे चाहते तिला जबरदस्त प्रतिक्रिया देत आहेत.

राणी चटर्जीने दीपिका पदुकोणच्या ‘दम मारो दम’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमधून तिचा हॉट लूक आणि एक्स्प्रेशन बघून तिचे चाहते तिचे कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “अक्कड बक्कड बम्बे बो‌” तिच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर हजारो व्ह्यूज मिळाले आहे.

याआधी राणीने तिचे काही फोटो देखील शेअर केले होते. या फोटोमध्ये ती लग्नाच्या ड्रेसमध्ये दिसत होती. एका फोटोमध्ये तिने एकटीने पोझ दिल्या आहेत, तर दुसऱ्या एका फोटोमध्ये ती तिच्या पतीसोबत दिसत आहे. या फोटोमध्ये तिने नारंगी रंगाचा लेहेंगा घातला आहे. तिच्या या फोटोवर देखील कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव झाला होता.

राणी ‘खतरों के खिलाडी’ या रियॅलिटी शोमध्ये देखील दिसली होती. या शोमधून तिने अनेकांची मनात जागा निर्माण केली आहे. राणी या शोमध्ये जास्त काळ टिकू शकली नाही, पण तिने प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळवले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रेक्षकांच्या भेटीला आलाय ‘घाघरा’! ‘देसी क्वीन’ सपना चौधरीच्या नव्या गाण्याचा पुन्हा एकदा देशभरात जलवा

-लाल साडीत पत्नी निघाली माहेरी! अंकुश राजाच्या ‘नारियलवा जोड़े जोड़े’ने तोडले सर्व रेकॉर्ड!

-तब्बल दहा किलो वजन कमी केलेल्या श्वेता तिवारीच्या स्टनिंग लुकची सगळीकडेच चर्चा! पाहा ‘हे’ खास फोटोज


Leave A Reply

Your email address will not be published.