भोजपुरी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री राणी चॅटर्जी आपल्या दमदार अभिनयाने वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अनेक चित्रपटांमध्ये काम करुन तिने अमाप संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवली आहे. अभिनेत्री सतत आपल्या बिंदास्त वक्तव्यामुळे ओळखली जाते. तिने अनेकदा राजकारण आणि इंडस्ट्रीमधील होणाऱ्या घडामोडींवर स्पष्टपणे मत मांडले आहे. सध्या पूर्ण भारतामध्ये शाहरुख खान स्टारर पठाण चित्रपटामधील बेशरम रंग या गाण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. यावर अनेक अभिनेत्री आणि कालारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत यामध्येच आता भोजपुरी अभिनेत्री राणीने देखिल मत मांडले आहे.
शाहरुख खान (Shaharukh Khan) मोस्ट अवेटेड चित्रपटामधील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या घेऱ्यात अडकलं आहे. राजकारणी ट्रोलर्स चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी करत आहेत. इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी पठाण (Pathan) चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. फक्त बॉलिवूडच नाही तर साऊथ इंडस्ट्रीने देखिल पठाणला सपोर्ट केलं आहे त्यासोबतच भोजपुरी सुपरस्टारर राणी चॅटर्जी (Rani Chatterjee) हिने देखिल पठाण चित्रपटाला सपोर्ट केला आहे. तिने सरकारवर संताप व्यक्त केला असून दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिला पाठिंबा देत मुलाखत देत भगव्या रंगावर होणाऱ्या वादावर स्पष्टच मत मांडले आहे.
राणी चॅटर्जीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, “आजकाल लोकांकडे काहीच काम धंदा नाही. चित्रपट आणि गाण्यांनी मनोरंजनाच्या दृष्टीनेच पाहिले पाहिजे. प्रत्येकच मुद्द्याला गंभीरपणे नाही घेतलं पाहिजे आणि बॉयकॉट का करायचं? आजची पिढी सनी लिओनी (Sunny Leony) हिचे गाणे बघत नाही का?”
राणी पुढे सांगते की, “रंगाणा घेऊन वाद निर्माण करणे हे बरोबर नाही. यापूर्वी देखिल दीपिकाने भगव्या रंगाचे कपडे घातले आहेत. ओम शांती ओम (Om Shanti Om) चित्रपटामध्येही तिने भगव्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्यापूर्वीही मुमताज (Mumtaj) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dikshit) यांनी देखिल भगव्या रंगाचे कपडे परिधान केले होते. त्याशिवाय मी देखिल बारिश गाण्यामध्ये भगव्या रंगाची साडी घातली होती, तेव्हा का कोणी वाद निर्माण केला नाही?”
राणीने न घाबरता सनी लिओलीचे नाव घेत तिने ट्रोलर्सला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याशिवाय तिने सरकारवरही संताप व्यक्त केला आहे. आता राणीच्या वक्तव्यानंतर सनी काही प्रतिउत्तर देईल का? हे पाहाणे खूपच महत्वाचे ठरणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्यासह उत्तम दिग्दर्शक देखील आहे सोहेल खान, ‘या’ हिट चित्रपटांचं केलंय दिग्दर्शन
दबंग खान’ सलमानचा भाऊ असूनही सोहेल खानला करावं लागलं होतं पळून जाऊन लग्न? वाचा कारण