Latest Posts

‘अपनी तो जैसे तैसे’ गाण्याच्या भोजपुरी री-क्रिएशनने ओलांडला १०० मिलियन व्ह्यूजचा टप्पा; पाहा खेसारी लालची धमाल


भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार खेसारी लाल यादव या दिवसांत खूपच धमाल करताना दिसत आहे. एका नंतर एक अशी अनेक सुपरहिट गाणी देऊन तो भोजपुरी संगीत क्षेत्राला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहचवत आहे. एकीकडे खेसारी लाल याचे सोशल मीडियावरील फॅन फॉलोविंग तर दुसरीकडे त्याच्या गाण्यांची लोकप्रियता यामुळे सध्या त्याचे नाव प्रत्येकाच्या ओठावर आहे.

खेसारी लालचे ‘अपनी तो जैसे तैसे’ या गाण्याने नुकताच १०० मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. त्याचे या वर्षातील हे पहिले गाणे आहे, ज्याने १०० मिलियनचा टप्पा पार केला आहे. हे गाणे लवकरच नवीन रेकॉर्ड तयार करेल, अशी सर्वांना आशा आहे. आतापर्यंत या गाण्याला १०,०४,०६,११५ एवढे व्ह्यूज मिळाले आहेत.

खेसारी लालचे हे गाणे सारेगामा हम भोजपुरीच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित केले होते. हे गाणे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘अपनी तो जैसे तैसे’ या हिंदी गाण्याचे भोजपुरी री-क्रिएशन आहे. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे, हे गाणे पूर्ण पार्टी साँग बनवले आहे. यामुळे हे गाणे वेगाने व्हायरल होत आहेत. प्रेक्षक या गाण्याला खूप प्रतिसाद देत आहेत. ( Bhojpuri star khesari lal yadav’s apni to jaise taise song cross 100 milian views)

‘अपनी तो जैसे तैसे’ हे गाणे खेसारी लालने गायिका शिल्पी राज सोबत गायले आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये खेसारी लाल सोबत आयुषी तिवारी दिसली आहे. आर्या शर्माने या गाण्याला म्युझिक दिले आहे. विजय चौहान यांनी या गाण्याच्या बोल लिहिले आहेत, तर बिभांशु तिवारी गाण्याचे दिग्दर्शक आहेत. याचे पीआरओ रंजन सिन्हा आहेत, तर लकी विश्वकर्मा हा कोरीओग्राफर आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘शेरनी’ बनलेल्या विद्याचा परफॉर्मन्स पाहून प्रभावित झाले प्रेक्षक; सोशल मीडियावर बांधले जातायेत अभिनेत्रीच्या कौतुकांचे पूल

-नोहा फतेहीने विचित्र अंदाजात घातली बिकिनी; अभिनेत्रीला पाहून वरुण धवनही झाला लोटपोट

-अरर!! ड्रेस एवढा गच्च होतोय की उर्वशी रौतेलाला बसायला देखील होतोय त्रास, एका सेशनमध्ये उडाली फजिती


Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss