लंडनमध्ये शूट केलेल्या पवन अन् अक्षरा सिंगच्या नवीन गाण्याची यूट्यूबवर धमाल; पाहायला मिळाली दोघांची दमदार केमिस्ट्री


सध्या संगीत क्षेत्रावर भोजपुरी संगीत आणि गाण्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पूर्वी फक्त बिहार, उत्तरप्रदेश अशा राज्यांपुरती मर्यादित असणारी ही गाणी संपूर्ण देशात पर्यायाने जगभरात ऐकली आणि पाहिली जातात. या गाण्याला आणि कलाकरांना मिळणारी प्रसिद्धी बघता अगदी थोड्या थोड्या दिवसांच्या अंतराने नवनवीन गाणी प्रदर्शित केली जातात. हटके शब्द आणि उडत्या चालीची ही गाणी लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांच्याच तोंडावर रुळताना आपल्याला दिसतात. या गाण्यांच्या निमित्ताने कलाकरांना देखील प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे आपल्या आवडीच्या कलाकारांच्या गाण्यांची फॅन्स आतुरतेने वाट बघत असतात.

भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग आणि अभिनेत्री अक्षरा सिंग यांचे नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘राजाजानी’ असे या गाण्याचे नाव असून, हे गाणे सध्या यूट्यूबवर जोरदार गाजताना दिसत आहे. नुकतेच रिलीज झाले असले, तरीही खूपच कमी काळात या गाण्याला जबरदस्त व्ह्यूज मिळाले आहेत.

‘राजाजानी’ गणायचे मुख्य आकर्षण म्हणजे या गाण्यात दिसणारी पवन आणि अक्षरा यांची दमदार केमिस्ट्री. त्यांची केमिस्ट्री पाहून चाहते घायाळ झाले आहेत. पवन सिंग आणि अक्षरा सिंग यांनीच गायलेल्या या गाण्याला मनोज मतलबी यांनी शब्दबद्ध केले असून, हे गाणे एसआरके म्युझिक या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले आहे.

पवन सिंग नेहमीच त्याच्या गाण्यांनी प्रेक्षकांना नाचायला प्रेरित करत असतो. यात जर भोजपुरी इंडस्ट्रीमधील दोन मोठे सुपरस्टार एकत्र आले, तर विचारायलाच नको. लंडनमध्ये चित्रित झालेल्या या गाण्यात या दोघांचा अंदाज, त्यांचा हटके डान्स आणि एक्सप्रेशन प्रेक्षकांना सारखे हे गाणे बघण्यासाठी आकर्षित करत आहे.

मागील बऱ्याच काळापासून या दोघांमध्ये सुरु असलेले वाद विसरून प्रेक्षक या गाण्याची मजा घेताना दिसत आहेत. पवन आणि अक्षरा यांचे जगभरात लाखो फॅन्स असून सर्वानाच या दोघाचे हे नवीन गाणे आवडत असल्याच्या प्रतिक्रिया देखील मिळत आहेत. यावरून हा अंदाज लावणे कठीण नाही की, हे गाणे देखील सुपरडुपर हिट होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपूर खानदानाप्रमाणेच धर्मेंद्र यांचाही होता मुलीच्या डान्स आणि चित्रपटात काम करण्याला विरोध; ‘अशाप्रकारे’ झाले तयार

-अनिल कपूरच्या ‘वो सात दिन’ चित्रपटाला ३८ वर्षे पूर्ण; मुख्य अभिनेता म्हणून ‘या’ अभिनेत्याला होती पहिली पसंती

-लोकांची मदत करता- करता सोनूने सुरू केले आपले सुपरमार्केट; १० अंड्यांवर मिळतेय ‘ही’ जबरदस्त ऑफर


Leave A Reply

Your email address will not be published.