भूल चूक माफ’ या चित्रपटाबाबत ब मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. राजकुमार राव (Rajkumar rao) आणि वामिका गिब्बी अभिनीत हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे. या निर्णयाकडे पीव्हीआर आयनॉक्ससाठी मोठा दिलासा म्हणून पाहिले जात आहे.
न्यायालयात पीव्हीआर आयनॉक्सच्या वतीने उपस्थित असलेल्या वरिष्ठ वकिलांनी माहिती दिली की मॅडॉक फिल्म्सने ६ मे रोजी पीव्हीआर आयनॉक्ससोबत करार केला होता. त्यानुसार, ‘भूल चुक माफ’ हा चित्रपट ९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु ८ मे रोजी मॅडॉक फिल्म्सने अचानक एक ईमेल पाठवला की आता हा चित्रपट १६ मे रोजी थेट ओटीटीवर प्रदर्शित होईल.
पीव्हीआरने पुढे आपली बाजू मांडताना म्हटले की त्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप गुंतवणूक केली आहे. त्यांनी स्क्रीन आरक्षित केल्या होत्या आणि देशभरातून हजारो तिकिटे आगाऊ बुक करण्यात आली होती. करारात असेही लिहिले होते की चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर किमान आठ आठवड्यांपर्यंत ओटीटीवर प्रदर्शित करता येणार नाही.
मॅडॉक फिल्म्सने आपल्या निर्णयामागे सुरक्षेची कारणे दिली. त्यांच्या वरिष्ठ वकिलांनी सांगितले की चित्रपटाचे थिएटरमध्ये प्रदर्शन आता शक्य नाही. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करणे अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरेल.
दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मान्य केले की मॅडॉक फिल्म्सने कराराचे उल्लंघन केले आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित करणे फायदेशीर नाही म्हणून करार मोडणे योग्य नाही. न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, कोणत्याही सरकारी आदेशाचे किंवा थिएटर बंद करण्याचे कोणतेही ठोस कारण सादर करण्यात आले नाही.
न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, ८ आठवड्यांचा होल्डबॅक कालावधी संपेपर्यंत हा चित्रपट कोणत्याही प्लॅटफॉर्मवर, विशेषतः ओटीटीवर प्रदर्शित करता येणार नाही. खटल्याची पूर्ण सुनावणी होईपर्यंत ही स्थगिती कायम राहील. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १६ जून २०२५ रोजी होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
बजरंगी भाईजानच्या मुन्नीला लोक समजत आहेत पाकिस्तानी; कमेंट्स मध्ये विचारणा, तुला पाणी मिळतंय का?
‘ट्रम्प जी, तुमच्या भिकारी मुलाने तुमचे तोंड…’, पाकिस्तानने युद्धबंदी तोडल्यावर देवोलिना भट्टाचार्य झाली व्यक्त