Friday, April 26, 2024

दीपिकाच्या शिरपेचात मानाचा तुरा, बनली सिनेसृष्टीत आशिया खंडातील सर्वात प्रतिभावान महिला

कलाकार हे चित्रपटांमध्ये अभिनय करण्यासोबतच इतरही अनेक उपलब्धी मिळवतात. कलाकार हे समाजासाठी, तरुणांसाठी एक आदर्श देखील असतात. मोठ्या मेहनतीने, संघर्षाने बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करणारे हे कलाकार त्यांच्या अभिनयासोबतच त्यांना मिळणाऱ्या विविध गौरवांमुळे देखील ते त्यांची एक नवीन ओळख निर्माण करतात. कलाकरांना मिळणारे हे सन्मान त्यांची मान तर उंचावतातच सोबतच देशाचे नावही मोठे करतात. बॉलिवूडमधील अशीच एक प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपिका पदुकोणच्या शिरपेचात असाच एक मनाचा तुरा रोवला गेला आहे.

आशिया खंडातील सर्वांत प्रभावशाली महिलांच्या यादीत दीपिका पदुकोणला स्थान मिळाले आहे. या यादीमध्ये दीपिकाने जागतिक टीव्ही आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधल्या सर्वच विभागांमध्ये टॉपवर आली आहे. या यादीत स्थान मिळवणे खूपच मोठी आणि मानाची बाब समजली जाते.

या यादीत स्थान मिळवण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींचा विचार केला जातो. यामध्ये अभिनेत्रींच्या सोशल मीडिया फॉलोवर्सपासून, त्यांना जगभरात गुगलवर किती सर्च केले आदी अनेक मुद्दे विचारात घेतले जातात. दीपिकाबद्दल बोलायचे झाले तर, तिला इंस्टग्रामवर १.३९ मिलियन फॉलोवर्स असून, सोबतच तिची मीडिया अंगेजमेंट आणि ट्वीट एक्सप्रेशन सर्वांत जास्त आहे. सोबतच तिला गुगलवर ३ मिलियन सर्च मिळाले असून, मीडिया मेन्शनदेखील सर्वांत जास्त आहे. या मुद्द्यांच्या आधारावर दीपिकाला या यादीत वरचे स्थान मिळाले आहे.

जगभरातील १०० देशांच्या टीव्ही, चित्रपट, सौंदर्य, राजकारण, उद्योग आदी क्षेत्रातील दिग्गज महिलांना या यादीसाठी नामांकन देण्यात आले होते. या यादीत दीपिकासोबतच अनेक दिग्गज महिला देखील सामील होत्या. त्यात एरियाना ग्रँड, किम कार्दशियन, एडेले आणि सेलिन डियोन या मोठ्या स्त्रियांचा समावेश होता.

दीपिकाच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, सध्या दीपिका दोन हॉलिवूड चित्रपटांमध्ये व्यस्त असून, सोबतच शाहरुख खानच्या ‘पठाण’ मध्ये देखील ती दिसणार आहे. दिपीका लिवाइस, नाइक, टिसोट, चोपर्ड आदी आंतरराष्ट्रीय ब्रँडसचे एंडोर्समेंट देखील करत आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सलमान, शाहरुख अन् आमिर घाबरतात कारण…’, नसिरुद्दीन शाह यांनी साधला तिन्ही खानांवर निशाणा

-‘शिवगामीदेवी’ची भूमिका साकारून मेगास्टार झाल्या रम्या; बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन्ससाठी सतत असायच्या चर्चेत

-OMG! यामी गौतमच्या चेहऱ्याची ही काय झाली हालत, पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे

हे देखील वाचा