मराठीतील मलायका ‘हीना पांचाळ’च्या अदा पाहून उंचावल्या चाहत्यांच्या भुवया! फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात


मराठीतील मलायका म्हणून नावाजलेली अभिनेत्री म्हणजे ‘हीना पांचाळ’ होय. बॉलिवूडमधील मलायका अरोरा अभिनेत्रीसारखी दिसत असणाऱ्या हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. परंतु ती जास्त चर्चेत तेव्हा आली, जेव्हा तिने बिग बॉसच्या घरात आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्रीने ती या घरात आली होती.

अत्यंत कमी वेळात हीनाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. तिच्या हॉट फोटोंमुळे ती नेहमीच लाईमलाईटमध्ये येत असते. आपल्या फोटोमुळे तिने अनेकांना आकर्षित केले आहे. हीनाचा अभिनय आणि अंदाज यामुळे तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या फिटनेसबाबत ती नेहमीच सजग असते. अनेकदा तिने आपले वर्कआऊटचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले असल्याचे दिसून येते. तिने आपले अनेक टिकटॉक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले होते. आपल्या फोटोच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांच्या भेटीला येत असते. तिचे फोटो पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्याखेरीज राहणार नाहीत.

हीनाने आपले अनेक फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत, त्यातील तिचा हिरव्या रंगाच्या ड्रेसवरच्या फोटोत ती कमालीची मादक दिसत आहे. हीनाच्या या फोटोतील तिच्या अदा एखाद्याला आपल्या प्रेमात पाडतील अशा आहेत. या फोटोत तिला अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर अनेक जण तिचा अंदाज पाहून घायाळ झाले आहेत.

तर दुसरीकडे तिने एका निळ्या रंगावरच्या ड्रेसवर फोटोशूट केले होते. हा ड्रेस तिने पापराजी क्लोसेट या प्रसिद्ध शॉपमधून खरेदी केला होता. या फोटोत ती उंच हिल घालून अधिकच सुंदर दिसत आहे. तिचा कमालीचा पोज देत असलेला फोटोही चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

हीनाचा आणखी एक लाल रंगाच्या ड्रेसमध्ये आपल्या अदांनी सर्वांना आपलेसे केले आहे. ज्यात ती म्हणतेय की, “सौंदर्य डोळे आकर्षित करतात पण आपल्या व्यक्तिमत्वाने हृदयावर राज्य करता येते.” या फोटोलादेखील चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. हीनाच्या प्रत्येक सेक्सी अदांवर नेटकरी फिदा झाले आहेत.

हीनाने २००४ साली आपल्या चित्रपट करियरची सुरुवात केली होती. पण अभिनेत्रीऐवजी ती आयटम गर्ल म्हणून अधिक नावारूपाला आली. तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केले आहेत. तिने ‘हुक्का’, ‘मूहल्ला’, ‘बेबो बेबो’, ‘राजा ओ राजा’ अशा चित्रपटात आयटम साँग केले आहेत. शिवाय २०१५ सालच्या फोर्ब्स इंडियाच्या शंभर अभिनेत्रींच्या यादीत हीनाचा समावेश होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्केटिंग करताना मराठमोळी जेनेलिया दुखापतग्रस्त, व्हिडिओ शेअर करत दिला प्रेरणादायी संदेश

-जेव्हा कपिलच्या लाईव्ह शोमध्ये घडतो असा काही प्रकार की, सर्वांनाच फुटतं हसू; पाहा मजेशीर व्हिडिओ

-वाह रे वाह! पावरी ट्रेंडमध्ये सहभागी झाले अनुपम खेर, वाढदिवस साजरा केला हटक्या अंदाजात


Leave A Reply

Your email address will not be published.