Thursday, November 30, 2023

‘या’ बड्या कलाकारांच्या मृत्यूने हादरली सिनेसृष्टी, चाहत्यांनाही बसला धक्का; पाहा यादी

छोट्या पडद्यावर काम करणारे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. अशातच, जेव्हा कलाकारांनी अचानक जगाचा निरोप घेतला, तेव्हा चाहत्यांना खूप वाईट वाटले. असेच काही कलाकार टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आहेत, ज्यांच्या उपस्थितीमुळे मालिका अधिक गाजल्या. मात्र, त्यांच्या मृत्यूने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला. चला, तर अशा कलाकारांबद्दल जाणून घेऊया, ज्यांच्या जाण्यानंतर मालिकेतील आकर्षण नाहीसे झाले.

रीमा लागू
रीमा लागू या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ हैं’, ‘मैने प्यार किया’ या सारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले. या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. त्याचवेळी अभिनेत्री रीमा लागू यांचा ‘नामकरण’ मालिकेदरम्यान मृत्यू झाला. माध्यमातील वृत्तानुसार, शोदरम्यान अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला हाेता.

कवी कुमार आझाद
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये डॉ. हाथी या भूमिकेतून आपली ओळख निर्माण करणारे कवी कुमार आझाद यांचे आकस्मिक निधन झाले. या मालिकेतील अभिनेत्याची डॉ. हाथी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. मात्र, 2018 मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आकस्मिक निधनाने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. याशिवाय त्यांच्या जागी आलेल्या नव्या अभिनेत्याला प्रेक्षकांचे ते प्रेम मिळाले नाही जे कवी कुमार आझाद यांना मिळाले.

गगन कंग
‘महाकाल’ या मालिकेत गगन कंग भगवान इंद्राची भूमिका साकारत होता. माध्यमातील वृत्तानुसार, या मालिकेचे शुटिंग संपवून ताे घरी परतत असताना त्यांच्या कारचा अपघात झाला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

सुरेखा सिक्री
सुरेखा सिक्री त्यांच्या अभिनयासाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक दिग्गज अभिनेत्री हाेत्या. त्यांनी अनेक उत्तमोत्तम मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. उतारवयातही त्यांनी कलाविश्वात काम करणे सोडले नाही. ‘परदेस में है मेरा दिल’ या टीव्ही मालिकेदरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि 2021 मध्ये त्यांनी जुलै महिन्यात अखेरचा श्वास घेतला.

घनश्याम नायक
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये नट्टू काका यांची भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांचेही आकस्मिक निधन झाले. नट्टू काकांच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या मालिकेत ते बऱ्याच दिवसांपासून काम करत हाेते आणि प्रेक्षकांच्या सर्वात आवडत्या पात्रांपैकी एक म्हणजे नट्टू काकांचे पात्र हाेते.(big characters who lost their lives during the show)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा :
Bye Bye 2022 । बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसाठी हे वर्ष ठरलं खूपच वाईट, काहींनी केली जेलवारी

Bye Bye 2022| यंदा लग्नबंधनात अडकेलेले मराठी कलाकार

हे देखील वाचा