Wednesday, December 6, 2023

अरे अरे मै तो गया रे! टीना दत्ता परतल्याने शालिन भनोटला आश्चर्याचा धक्का…

लेकप्रिय कार्यक्रमामध्ये शनिवार (दि, 10 डिसेबंर) रोजी पार पडलेल्या भागामध्ये खूपच धमाल पाहायला मिळाली. त्यासोबतच शुक्रवार वारमध्ये नुकतंच घरमामध्ये एका नवीन सदस्याची एंट्री झाली आहे. आणि शनिवार रोजी टीना दत्ता हिला बेघर केले गेले. मात्र, यामध्ये टीनाला वाचवणे हे शालिन भनोट याच्या हातामध्ये होते. पण त्याने आपले 25 लाख रुपये वाचवत टीनाला बेघर केले मात्र, नुकत्या प्रद्रशित झालेल्या प्रमोमध्ये खूप धमाकेदार गोष्ट पाहायला मिळैली जी आजपर्यत कोणचत्याच सिजनमध्ये पाहायला मिळाली नाही.

बिग बस 16‘ (Bigg Boss)चे दिवस भरत आले आहेत त्यांमुळे घरातील प्रत्येकच सदस्य खूप चांगल्या प्रकारे खेळताना दिसून येत आहे. यासगळ्यामध्ये मात्र, शालिन भनोट (Shalin Bhanot) आणि टीना दत्ता (Tina Dutta) यांचं नातं कितपत खरं आणि खोटं आहे हे स्पष्ट करण्यासाठी बिग बॉसने शालिनसोबत चांगलाच गेम प्लॅन केला आहे. ज्यामुळे घरामध्ये खूप धामाल पाहायला मिळणार आहे.

शनिवारी प्रसारित झालेल्या भागामध्ये दाखवण्यात आले की, सुंबुल तौकीर (Sumbul Tauqeer) आणि टीना दत्ता या दोघी घरामध्ये राहण्याची चावी शालिनच्य हातामध्ये होती. मात्र, यासाठी त्याच्यासमोर एक शर्यत होती. सलमान खान (Salman Khan) सांगितले की, मी 10 पर्यत मोजन्याच्या आत तू जर बजर नाही दाबले तर 25 लाख वाचतील आणि जर बजर दाबलं तर तुझ्या प्राइजमनी मधून 25 लाख कमी केले जातील. मात्र, शालिन बजर दाबत नाही आणि कमी मतामुळे टीना घरातून बाहेर जाते. सगळ्यांना वाटते की, टीना गेल्यामुळे शालिन खूप रडेल मात्र, त्याने थोड्यावेळ नाटक केले आणि दुसऱ्या दिवशी त्याचे खरे रुप दाखवले.

प्रदर्शति झालेल्या प्रोमोमध्ये शालिन खूप खुश असल्याचे दिसून आला. शालिन किचनमध्ये श्रीजीता डे (Srijita Day) हिला बोलताना दिसला, त्यावेळी अर्चना गौतम (Archana Gautam) त्याला बोलते की, “तुला माहित होते की, टीना जाणार आहे.” तेव्ह शालिन म्हणतो की, “जेव्हा सलमान सर 7 पर्यत आले तेव्हा मला समजले की, टीना जाणार आहे. तेव्हा मी सांगितले की, मी सगळ्यांसाठी हे नाही करुन शकत मग मोटिवेशन मरुन जाइल. आणि जर प्राइजमनी शुन्य झाली तर.”

तेव्हा श्रिजिता म्हणते की, “तु काल खूप रडत होतास.” त्यावर शालिन म्हणतो की, “मला पाहून तुला असं वाटत आहे का मी रडेल? आणि मी सांगत आहे की मला काळजी फक्त माझ्या जेवणाची आहे. तुला काय वाटत आहे…असंही टीना मला फार काही आवडत नव्हती. बाहेर गेल्यानंतर मी तिला बोलणारही नाही.” शालिनचे असे बोलने ऐकून श्रीजीता आश्चर्यचकित होते. मात्र,एका प्रेमोमध्ये टीना पुन्हा आल्याचे दाखवले आहे आणि बिग बॉसने टीनाला शालिनचा खरा चेहरा दाखवला आहे. आता पुढच्या भागामध्ये शालिन आणि टीना यांच्यामद्ये काय वाद होतील हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता लागली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
ब्लॅक अ‍ॅंड व्हाइटमधील फोटोंमध्ये तेजस्वी प्रकाशची घायाळ करणारी अदा…
दिलीप कुमार आणि मधुबाला प्रेमकहाणी: फक्त एका हट्टामुळे तुटली बॉलिवूडची सर्वात रोमॅंटिक आणि चर्चित प्रेमकहाणी

हे देखील वाचा