Saturday, March 2, 2024

Munnawar Faruqui | अखेर प्रतीक्षा संपली! सगळ्या संकटांवर मात करत मुन्नवर फारुकी बनला ‘बिग बॉस 17’ चा महाविजेता

Munnawar Faruqui | अखेर बिग बॉस 17 च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. लोकप्रिय रिॲलिटी शोच्या 17व्या सीझनचा विजेता मुनावर फारुकी ( Munnawar Faruqui ) याला मिळाला आहे. सलमान खानने त्याच्या नावाची घोषणा केली आहे. यासोबत बिग बॉस 17 चा प्रवास आता संपला आहे. अभिषेक कुमार या शोचा उपविजेता ठरला आहे.

बिग बॉसमध्ये मुनावर फारुकी, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण मशेट्टी या पाच फायनलिस्टमध्ये स्पर्धा होती. अरुण मशेट्टी हा शोमधून बाहेर पडणारा पहिला होता. त्यांच्यानंतर अंकिता लोखंडेला बाहेर गेली. त्यानंतर प्रियांका चोप्राची बहीण मन्नारा हिनेही शो सोडला. यानंतर अभिषेक कुमार आणि मुनाव्वर यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली, ज्यात मुनव्वरने बाजी मारली.

munnawar faruqui
munnawar faruqui

या शोच्या विजेत्याची घोषणा सलमान खानने केली. मुनव्वर यांना विजेत्याची ट्रॉफी दिली. ट्रॉफीशिवाय मुनव्वरला 50 लाख रुपये आणि एक कार मिळाली आहे. बिग बॉस शोपूर्वी मुनव्वरने लॉकअप शोची ट्रॉफीही जिंकली होती. आता त्यांचा हा दुसरा मोठा विजय आहे.

स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. कंगनाने होस्ट केलेल्या ‘लॉकअप’ या वादग्रस्त रिॲलिटी शोचा विजेता म्हणून प्रसिद्धीझोतात आलेला मुनव्वर कोणत्या ना कोणत्या वादामुळे रोजच चर्चेत असतो. मुनव्वरने स्टँड अप कॉमेडियन म्हणूनही आपल्या कारकिर्दीला पंख दिले आहेत. त्याची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

ऍनिमल चित्रपटात ‘अबरार’ करणाऱ्या बाॅबी देओलला झाला होता भयानक अपघात, अजुनही आहे पायात राॅड
बिगबाॅसच्या विजेत्याला मिळणार कार,होणार बक्षीसांचा वर्षाव, चला जाणुन घेऊया विनरच्या प्राइज मनीची रक्कम

हे देखील वाचा